ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना राबवू : अशोक कुरी

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना त्यांचे उर्वरीत आयुष्य आनंदात घालवण्यासाठी मनाला विरंगुळा देणाऱ्या कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन प्रोबस क्लबचे अध्यक्ष अशोक कुरी यांनी केले.

बोरी: ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना त्यांचे उर्वरीत आयुष्य आनंदात घालवण्यासाठी मनाला विरंगुळा देणाऱ्या कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन प्रोबस क्लबचे अध्यक्ष अशोक कुरी यांनी केले.

प्रोबस क्लब फोंडाच्या अशोक कुरी यांच्या अध्यक्षतेखालील नव्या समितीला मावळते अध्यक्ष रामदास शेट वेरेकर यांनी क्लबचा ताबा देण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी क्लबचा ताबा घेतल्यावर क्लबच्या कार्यासंबंधी कुरी बोलत होते.

याप्रसंगी क्लबचे उपाध्यक्ष जयवंत आडपईकर, सचिव अशोक तरळे, कोषाध्यक्ष बाबलो पारकर, काशिनाथ जोशी, नरहरी नाईक, रत्नाकर पैदरकर, प्रोबस क्लब ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे, गुणा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी अध्यक्ष रामदास शेट वेरेकर यांनी क्लबच्या सर्व सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकाधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. सध्या कोरोना महामारीमुळे मोठे कार्यक्रम करता येत नसले, तरी ज्येष्ठ नागरिकांना आवडतील असे प्रकल्प हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मनोहर तिळवे, गुणा नाईक, काशिनाथ जोशी, बाबलो पारकर, नरहरी नाईक यांनी क्लबतर्फे विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या.

रामदास शेट वेरेकर यांनी नूतन अध्यक्ष अशोक कुरी यांच्याकडे क्लबचा ताबा दिला. यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष श्रीप्रसाद सिरसाट अलीकडेच दिवंगत झाल्याने दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. रामदास शेट वेरेकर यांनी प्रास्ताविक केले. अशोक कुरी यांनी स्वागत केले. जयवंत आडपईकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अशोक तरळे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या