गोव्याचे मानांकन सुधारण्यासाठी बिझीनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन ची अंमलबजावणी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

गोव्याचा व्यवसाय सुलभतेत घसरलेला क्रमांक सावरण्यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आता प्रयत्न करणे सुरू केले आहे.

पणजी: गोव्याचा व्यवसाय सुलभतेत घसरलेला क्रमांक सावरण्यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आता प्रयत्न करणे सुरू केले आहे. यासाठी व्यवसायातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी अशा अकरा वेबिनारांचे  आयोजन मंडळाने केले आहे. मंडळाने व्यवसाय मुल्यांकन करण्याच्या सुसूत्रतेमध्ये गोव्याचे मानांकन सुधारण्यासाठी बिझीनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन(बीआरएपी) 2020 ची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. 

या विकेन्डला गोव्याला जाताय? जाणून घ्या विमानांचे वधारलेले दर -

गोवा-आयपीबीच्या https://www.goaipb.goa.gov.in या वेबसाईटवर या वेबिनारचा कार्यक्रम उपलब्ध आहे. एप्रिल 2021 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी अशा एकूण ११ वेबिनारची आखणी करण्यात आली आहे. प्रत्येक खाते त्याच्या ठराविक वेळेत सहभागींच्या सेवांबद्दलच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करेल. या सेवांचा उपयोग करणारे नागरीक आणि व्यावसायिक वापरकर्ते यांनी राज्याने हाती घेतलेल्या सुधारणांविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी आपल्या सोईनुसार या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे आणि तुमच्या अभिप्राय थेट सरकारला कळवावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

कार्निव्हल,व्हॅलेंटाईन विकमध्ये गोव्याकडे वळली पर्यटकांची पावले -

संबंधित बातम्या