हरमल ‘आरंबोल’मुळे पेडणे तालुक्याला महत्त्व

 Importance of Pedne taluka due to Harmal Arambol
Importance of Pedne taluka due to Harmal Arambol

हरमल :  पेडणे तालुक्यातील मांद्रे मतदारसंघातील हरमल ‘आरंबोल’ ह्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘स्वीट लेक’. अर्थात गोड्या पाण्याचे तळे. या भागास स्थानिक लोक ‘वाघ कोळंब’ म्हणून ओळखतात. पूर्वी या भागात वाघांचे वास्तव्य असायचे, या समजुतीमुळे स्थानिक लोकं जायला घाबरायचे. अशा ह्या दुर्लक्षित व निर्जन एकांत भागात स्थानिक व्यावसायिकांनी रेस्टॉरंट व काही निवासी सुविधा निर्माण केल्या आहेत. अनियोजित पद्धतीचा विकास मारक, घातक व विध्वंसक ठरत असतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे येथील गोड्या पाण्याचा तलाव होय. हा तलाव सध्या विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे.


गोड्या पाण्याचे तळ्याचे जतन व संवर्धन करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवर प्रभावीपणे होऊ शकले नाही हे अंतिम सत्य आहे. भौगोलिकदृष्ट्या हा स्वीट लेक भाग पालये हद्दीत असला तरी त्याठिकाणी सुरक्षित पोचण्याची पायवाट हरमलातून तुडवावी लागते. 
गेल्यावर्षी एका विदेशी पर्यटकाने कचऱ्याच्या स्थितीबाबत राज्यपालांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पंचायत मंडळ व कचरा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कचऱ्याची उचल केली गेली. गोड्या पाण्याच्या तलावाला जोडणारा पाणी प्रवाह म्हणजे डोंगराच्या कुशीतून फक्त पावसाळ्यात वाहणारा ओहोळ. 


सद्यःस्थितीत पर्यटन स्थळें उद्धाराच्या प्रतीक्षेत असून, ‘कोविड’चा काळ मुळावर उठला आहे. जागतिक कोरोना संकटामुळे विदेशी पर्यटक गेले दहा महिने भारतात अडकलेले असून, त्यांचा वावर पर्यटन हंगामाला तारणारा ठरूच शकत नाही, असे मत व्यावसायिक सूर्या बर्डे यांनी सांगितले. 
सध्या पर्यटन धोरणात चांगल्या पद्धतीने स्थानिक व्यावसायिकांना दिलासा दिला असला तरी पर्यटन स्थळाच्या विकासात स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन अंमलबजावणी करणे रास्त असल्याचे व्यावसायिक सुहास प्रभू यांनी सांगितले.


स्वीट लेकचे जतन करण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटल्यास कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही. मात्र, स्थानिक लोक व्यवसायात गुंतले असल्याने साहजिकच जबाबदारी पंचायत मंडळाने घेणे आवश्यक आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

गोव्याला लाभलेला विलोभनीय समुद्रकिनारे जितके महत्त्वाचे आहेत. तितकेच गोव्याला लाभलेले निसर्गसौंदर्य याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. कारण ग्रामीण भाग हा गोव्याचा आत्मा आहे. ग्रामीण भागातील विहंगम परिसरामुळे या ठिकाणी भेट देणारे पर्यटक पुन्हा आल्यावाचून राहत नाही. राज्यातील अनेक प्रसिद्ध तळी आहेत. या तळींचे संवर्धन करण्याबरोबरच टिकवणेही गरजेचे बनले आहे. सध्या करमळी व हरमल येथील तळ्यांकडे पर्यटनदृष्ट्या दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यादृष्टीने सरकारने विचार करण्याची गरज आहे.

प्रदूषण मोजण्याची सुविधेची पंचायतीसाठी गरजेची...
रानावनातील केरकचरा, लाकुडधोंडे, प्लास्टिक कचरा आदी वस्तू तळ्यात एकरूप होत असतात. त्याच्या भरीस सांडपाणी व अन्य नाशवंत वस्तूमुळे पाणी प्रदूषित होत असावे, असा अंदाज असल्याचा निष्कर्ष आहे.
तळ्यातील पाणी प्रदूषित झाल्याची तक्रार मात्र तशीच रेंगाळत राहिली. वास्तविक पाणी प्रदूषण होण्याची कारणे अनेक असली तरी पंचायतीच्या निदर्शनास सदर बाब येणे कठीण असते. जोपर्यंत स्थानिक पंचायतीकडे प्रदूषण मोजण्याची सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत पाण्याचे प्रदूषण होतच राहणार हे नक्की. 
 

पर्यटनस्थळांचे संवर्धन गरजेचे
व्यावसायिक ख्रिस्तोफर फर्नांडिस यांनी सांगितले की, रेस्टॉरंटचा कचरा व सांडपाणी आम्ही स्वतःच्या जागेत व निर्मनुष्य ठिकाणी व्यवस्थितपणे निचरा करीत असतो. गोड्या तळ्याच्या पाण्यात सांडपाणी निचरा करणे घातक तर आहेच शिवाय पर्यटनाच्यादृष्टीने संहारक आहे. पर्यटन स्थळांचा विकास व जतन तसेच संवर्धन करणे अत्यावश्यक असून परिसर अस्वच्छ करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, असे ख्रिस्तोफर फर्नांडिस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com