महाराष्ट्र आणि गोव्यात रेती पुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय 

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

गोव्यामध्ये सध्या रेती काढण्यास न्यायालयाची बंदी आहे. यामुळे गोव्यातील ट्रक महाराष्ट्रात जाऊन रेती आणू शकतील आणि महाराष्ट्रातील रेती व्यावसायिक गोव्यात रेती पुरवठा करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

पणजी : गोव्यामध्ये सध्या रेती काढण्यास न्यायालयाची बंदी आहे. यामुळे गोव्यातील ट्रक महाराष्ट्रात जाऊन रेती आणू शकतील आणि महाराष्ट्रातील रेती व्यावसायिक गोव्यात रेती पुरवठा करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. (Important decision regarding sand supply in Maharashtra and Goa)

गोव्यातील आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेला नकार 

मुख्यमंत्री डॉ.  प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना सांगितले की भाजपचे महाराष्ट्रातील नेते खासदार नारायण राणे यांनी आपल्याला यासंदर्भात दूरध्वनी केला होता. महाराष्ट्रातील कायदेशीर रेती गोव्यात आणण्यास परवानगी द्या अशी सूचना मी अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील रेती कायदेशीररीत्या गोव्यात येऊ शकेल गोव्यातील ट्रक ही महाराष्ट्रात जाऊन कायदेशीरपणे रेती आणू शकतील. गोव्यातील रेती काढण्यावर सरकारने निर्बंध घातलेले नाहीत, काही बिगर सरकारी संस्था न्यायालयात गेल्या आहेत आणि न्यायालयाने रेती काढण्यावर बंदी घातलेली आहे.

संबंधित बातम्या