गोवा: कोरोना पार्श्वभुमीवर मायेतील माल्याची जत्रा रद्द

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मये येथील प्रसिद्ध माल्याची जत्रा या वर्षी रद्द करण्यात आली असल्याचे समजते आहे. 

डिचोली: देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जाताना दिसते आहे. देशातील अनेक राज्यात नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाऊन सारखे निर्णय घेण्यात आले आहेत. तर राज्यात देखील कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यसरकारने राज्यात लोकडाऊन लावणे परवडणारे नसल्याने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मये येथील प्रसिद्ध माल्याची जत्रा या वर्षी रद्द करण्यात आली असल्याचे समजते आहे.( Important News About Malya jatra In Mayem)

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव लक्षात घेता मये (Mayem) येथील प्रसिद्ध माल्याची जत्रा या वर्षी रद्द करण्यात आली आहे. माया केळबाय देवस्थान समितीने डिचोली मामलेदरव देवस्थान प्रशासक प्रवीनजय पंडित याना या संदसर्भात लेखी निवेदन सादर केले आहे. कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी  जत्रोत्सव व कार्यक्रमांत गर्दी करण्यास मर्यादा घातलेली असल्याने २० तारखेला होणाऱ्या जत्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याने आम्ही  जत्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे देवस्थान समितीने  ममलेदारांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

गोव्यातील 58 हजार 746 दात्यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आवाहन

संबंधित बातम्या