गोवा: लॉकडाऊन बद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे महत्वाचे विधान

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला असून लॉकडाऊन बद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे.

देशभरता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक होत जाते आहे. रुग्णवाढी सोबतच लास, इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याच्या देखील अनेक घटना समोर येता आहेत. याच पार्शवभूमीवर अनेक राज्यांत अंशतः लॉकडाऊन सारख्या पर्यायांच्या माध्यमातून निर्बंध लावले जात आहेत. त्यातच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला असून लॉकडाऊन बद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. (Important statement of Chief Minister Pramod Sawant about lockdown)

राज्यात दिवसेंदिवस कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यातील जनतेला कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. ' राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा. तसेच यावेळी आम्ही लॉकडाऊन (lockdown) लागू करू शकत नाही कारण त्यामुळे राज्याचे अर्थचक्र ढासळते, म्हणून स्थानिकांनी आणि पर्यटकांनी सुद्धा खबरदारीच्या उपायांचे पालन करावे अशी विनंती प्रमोद सावंत यांनी केली आहे. 

दरम्यान, गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंसदिवस वाढत जात असतानाच कोरोना रुग्णांची संख्या ६३,३४२ वर पोहोचली असून, राज्यातील वेगवगेळ्या कोरोना रुग्णालयांत ४८८८ कोरोना रुग्ण सध्या उपचार घेता आहेत. 

संबंधित बातम्या