किचन गार्डनमधील कामाची कौशल्ये समृद्ध करा.

तेजश्री कुंभार
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

किचन गार्डनिंग म्हणजे आपल्या घरात किंवा आसपास फळे, भाज्या, डाळी, हिरव्या भाज्या इत्यादी उगविण्यासाठीची संकल्पना आहे, यापैकी बहुतेक गोष्टी सहज आपल्या आवाक्यात उपलब्ध आहेत.

पणजी, 

जगभरात कोरोना विषाणूच्या महामारीने आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये  अनेक
आव्हाने उभी केली आहेत. संचारबंदी उठवल्यानंतरही आपल्या मुलभूत गरजांसाठीही घराबाहेर पडणे लोक टाळत आहेत कारण संचारबंदीच्या काळात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण महिन्यासाठी आपल्या घरात राहून जगणे हे एक माणसासाठी आव्हान आहे. अशा तणावग्रस्त वातावरणामध्ये आपली कला, कौशल्ये आणि छंद आपल्या कामी येत आहेत. लोक स्वत: ला गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडील कौशल्यांचा वापर करीत आहेत
शिवाय काही नवीन कौशल्ये आणि छंददेखील शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या सर्व बाबींमध्ये किचन गार्डनिंगची कल्पना या काळात उदयास येत आहे आणि ट्रेंड बनत आहे.
किचन गार्डनिंग म्हणजे आपल्या घरात किंवा आसपास फळे, भाज्या, डाळी, हिरव्या भाज्या इत्यादी उगविण्यासाठीची संकल्पना आहे, यापैकी बहुतेक गोष्टी सहज आपल्या आवाक्यात उपलब्ध आहेत.
घरचे बागकाम देखील कीटकनाशके आणि रासायनिक खतांपासून मुक्त आहे. म्हणूनच, किचन गार्डनिंगमधील कौशल्य वाढविण्यासाठी, आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंपाकघर आणि गृह बागकाम कोर्स आयोजित करीत आहे.
किचन अँड होम गार्डनिंग कोर्स (स्वयंपाकघर आणि गृहबागकाम) ८ ते १६ ऑगस्ट, २०२० या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे आणि हा दोन भाषांमध्ये विभागण्यात आला आहे. ८ आणि ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:००, ११ ते १३ रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ४:३० आणि १५ आणि १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० या कालावधीत कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कोर्स नैसर्गिकरित्या पीक वाढीची विविध आणि सोपी तंत्रे तसेच निसर्गाशी संबंधित फायद्यांविषयी माहिती देणारा असेल. 
या कोर्सच्या पॅनेलमध्ये श्री. सुनील.जी आहेत ज्यांची  गोव्यामध्ये २६ वर्षांपासून नर्सरी आहे. आरती. आर. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका आरती.आर असून त्या नैसर्गिक अन्नाबद्दल जनजागृती करीत आहेत. पुष्पा.एस, ज्या फाउंडेशन फॅकल्टीचा एक भाग आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि श्री गुरुजी आर्ट अकॅडमीचे संस्थापक आणि अरुणसिंग आर, कॉर्पोरेट लीडर आणि सुविधा देणारे एक शेतकरी यांच समावेश आहे. या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी आपण 9373238440 /9867376265/
9765392969 वर संपर्क साधून नोंदणी करू शकता.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक आणि गोवा एपेक्सचे (APEX) सदस्य श्री. सुनील. जी म्हणाले, “हा कोर्स प्रामुख्याने तुमचे उत्पादन नैसर्गिकरित्या पिकविण्यावर कोणत्याही रसायनांचा वापर न करता नैसर्गिकरित्या पीक वाढवण्याच्या सर्वोत्कृष्ट मार्गावर केंद्रित असेल. ही तंत्रे आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहेत आणि या कोर्सच्या माध्यमातून कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे करावे याची कल्पना देखील तुम्हाला येऊ शकणार आहे. या अभ्यासक्रमाचा मी एक भाग असल्याने मला आनंद झाला आहे
आणि आशा आहे की हा अभ्यासक्रम सर्व सहभागींसाठी फायदेशीर ठरेल. ” स्वयंपाकघरातील बागकामाचे स्वत: चे असे काही फायदे आहेत ते म्हणजे आपण आपल्या घरातच ताजी
भाजी पिकवू शकतो ज्यामुळे इतर लोकांच्या उत्पादनांवर आपण कमी अवलंबून राहतो. या साथीच्या आजाराच्या काळात किचन गार्डनिंगला बरेच मूल्य प्राप्त झाले आहे कारण ते पूर्णपणे सुरक्षित आहेच
शिवाय समाधान देणारेही आहे. ‘नैसर्गिकरित्या भाजी वाढवा, नैसर्गिक खा नैसर्गिक राहा; या आशयाचे उद्दीष्ट ठेवून आर्ट ऑफ लिव्हिंग्ज किचन आणि होम गार्डनिंग कोर्स ही निरोगी आयुष्यासाठीची न दवडण्यासारखी संधी आहे.
या कोर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया संपर्क साधा: 9373238440/ 9867376265/ 9765392969

संबंधित बातम्या