गोव्यात मोबाईल चोरीचे ऊत, 4 महिन्यात 'एवढे' फोन झाले चोरी; 29 टक्के सापडले, बाकीचे केले ब्लॉक

राज्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरट्यांचे शिकार होतात.
Mobile Theft
Mobile Theft

गोव्यातून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरट्यांचे शिकार होतात. मागील चार महिन्यात राज्यातून 1,057 मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यापैकी केवळ 29 टक्के मोबाईल सापडले असून, आणि बाकीचे मोबाईल ब्लॉक केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यात चोरीला गेलेल्या 1057 पैकी 310 मोबाईल परत मिळाले आहेत. दरम्यान, चोरी झाल्यानंतर पोलिसांनी 1,009 मोबाईल ब्लॉक केले होते. त्यापैकी 48 फोन पुन्हा अनब्लॉक करण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, 310 मोबाईल फोनपैकी 262 उत्तर गोव्यातून आणि 48 फोन दक्षिण गोव्यातील आहेत. तसेच, 1009 ब्लॉक केलेल्या मोबाईल फोन पैकी 874 उत्तर आणि 134 फोन दक्षिण गोवा पोलिसांनी ब्लॉक केले आहेत. तसेच, एक फोन गुन्हे शाखेने ब्लॉक केला आहे. केंद्रीय उपकरण ओळख यादीतून (Central Equipment Identity Register) ही माहिती मिळाली आहे.

Mobile Theft
Mopa Airport: मोपा येथील विमानतळाच्या उभारणीसाठी कोणत्या कंपनीचे, किती प्रमाणात वापरले स्टील?

फोन चोरीला झाल्यास तुम्हीच करा ब्लॉक!

फोन चोरीला गेल्यानंतर त्यात आपली महत्वाची आणि गोपनीय माहिती असते. ती माहिती दुसऱ्याच्या हाती लागेल अशी भीती आपल्याला असते. आपला डेटा सुरक्षित राहावा यासाठी दूरसंचार खात्याने केंद्रीय उपकरण ओळख यादी (Central Equipment Identity Register) हे संकेतस्थळ सुरू केले आहे.

फोन चोरी झाल्यानंतर संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून चोरीला गेलेला फोन सहज ब्लॉक करता येऊ शकतो. तसेच, मोबईलमध्ये दुसरे सिमकार्ड घातल्याच स्थानिक पोलिसांनी त्याची तात्काळ माहिती मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com