मांडवीतीरी 'कोकण' फळ महोत्सव

चर्चासत्रांचे आयोजन: नानाविध फळांच्या प्रदर्शनाला नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी
मांडवीतीरी 'कोकण' फळ महोत्सव
Konkan Fruit FestivalDainik Gomantak

पणजी: राज्यातील पारंपरिक फळ उद्योगाला प्रोत्साहन देण्याबरोबर फळ उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ‘बॉटनीकल सोसायटी ऑफ गोवा’ यांच्यातर्फे पणजीत आजपासून कोकण फळ महोत्सवाला सुरवात झाली.

आंबा, काजू, फणस, केळी या प्रमुख फळांबरोबर चिक्कू, जांभूळ, करवंदे, जाम, नारळ यांसारख्या फळांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2003 पासून पणजीत बॉटनिकल सोसायटी ऑफ गोवाच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Konkan Fruit Festival
खरी कुजबुज... आरक्षणात अडकल्या गोव्यातील पंचायत निवडणुका

यंदा मांडवी किनाऱ्यावर भरलेल्या या महोत्सवात शेतकऱ्यांसोबत धारवाड कृषी संशोधन विद्यापीठ, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, गोवा कृषी संचालनालय, औषधी वनस्पती मंडळ गोवा, गोवा वन विभाग, डॉन बॉस्को कृषी केंद्र, ‘आयसीएआर’ यांसारख्या शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. या ठिकाणी फळांच्या प्रदर्शनाबरोबर फळझाडांची रोपे, खतांची मात्रा, फळ लागवड यावर मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. याशिवाय विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत.

आंबा खरेदीसाठी गर्दी

या फळ महोत्सवात पारंपरिक पद्धतीने पिकवलेली सेंद्रीय फळे उपलब्ध असून, प्रामुख्याने मानकुराद, हापूस याबरोबर देशी आंबे उपलब्ध आहेत. यात मानकुराद आंबा खरेदीसाठी नागरिकांनी केली होती. सर्वसाधारपणे या महोत्सवात 400 ते 500 रुपये डझन याप्रमाणे आंब्याची विक्री झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.