
Wild Boar Poaching in Goa: पेटके-धारबांदोडा येथील एका खासगी जागेत उघड्यावर खुलेआम डुक्करांची बेकायदा कत्तल करण्याचा प्रकार काल मंगळवारी उघडकीस आला.
विशेष म्हणजे ज्या जागेत हे सर्व सुरु होतं ती जागा एका महिलेच्या नावावर असून तिला परिसरात ‘आंटी’ म्हणून ओळखले जात असल्याची माहिती वनपालांकडून देण्यात आलीय. तिच्या अखत्यारीत असलेल्या या जागेचा वापर कत्तलीसाठी करण्यात येत होता.
दरम्यान डुक्करांची शिकार करून कत्तल करणारी ही टोळी कर्नाटक, हुबळी येथील असून वन खात्याने आपल्या धडक कारवाईत बसव्वा रमेश दोड्डामणी उर्फ आंटी (65) या महिलेसह मंजुनाथ दोड्डामणी (38) या संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या रॅकेटमध्ये कर्नाटक मधील आणखी एक व्यक्ती सहभागी असून तो अद्याप फरार आहे. या आरोपीला पकडण्यासाठी गोव्याचे वन अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत.
धारवाड आणि हुबळी परिसरातील मानवी वस्तीत फिरणाऱ्या रानडुकरांना जाळ्यांचा वापर करून पकडून गोव्यात आणण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना सांगे सत्र न्यायलयात हजर केले असता त्यांची दोन दिवस रिमांडवर वन खात्याच्या कस्टडीत रवानगी करण्यात आली.
या प्रकणात गुंतलेल्यांच्या मागावर आम्ही असून लवकरच त्यांनाही गजाआड करण्यात येईल असा विश्वास वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.