म्हापशात प्रत्येक प्रभागात शिवप्रतिमा हव्याच!

एकतानगरमधील पुतळा हटवण्यास सांगितल्याने शिवप्रेमींच्या प्रतिक्रिया
म्हापशात प्रत्येक प्रभागात शिवप्रतिमा हव्याच!
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak

म्हापसा: म्हापशातील प्रत्येक प्रभागातील प्रखुख चौकांत शिवप्रतिमा उभारण्याची आज गरज निर्माण झाली आहे, अशा प्रतिक्रिया म्हापशातील शिवप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.

गोवा मंदिर महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ भाई पंडित म्हणाले, राष्ट्रवादाची जोपासना व धर्मरक्षणासाठी म्हापसा शहराच्या प्रत्येक प्रभागात शिवाजी महाराजांचे छोटेखानी उभारणे अत्यावश्यक झाले आहे. छत्रपतींचा एकतानगर-म्हापसा येथील पुतळा हटवण्यास पोलिसांनी स्थानिक युवकांना बजावल्याने संपूर्ण म्हापशातील शिवप्रेमी पुतळ्याच्या ठिकाणी एकत्रित झाले व त्यांनी संताप व्यक्त केला.

Chhatrapati Shivaji Maharaj
गोव्यात मोफत शिक्षण योजनेला मिळेना प्रतिसाद

एकतानगर येथे अर्धपुतळा उभारल्याने म्हापसा मतदारसंघाचे भाजप आमदार ज्योशुआ डिसोझा पोलिसांवर दबाव आणत असल्याने पुतळा हटवण्याच्या उद्देशाने स्थानिक युवकांची पोलिस छळवणूक करीत आहेत, असे म्हापशातील हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख जयेश थळी यांनी केला आहे.

चंद्रकांत पंडित यांनी दावा केला आहे, की गेल्या काही वर्षांपूर्वी त्याच परिसरात एक अनधिकृत क्रॉस उभारण्यात आल्याची तक्रार मी स्वत: पोलिसांत तक्रार केली होती. तथापि, त्या तक्रारीबाबत कोणतीही कारवाई पोलिसांनी अजूनही केलेली नाही.

पोलिसांनी अथवा इतर कुणीही शिवरायांच्या पुतळ्याला हात लावूनच दाखवावे, असे आव्हान शिवप्रेमींच्या वतीने देत शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख रमेश नाईक म्हणाले, म्हापसा पोलिस निरीक्षकांच्या माध्यमातून शिवरायांचा पुतळा हटवण्यासाठी आमदार प्रयत्नशील असल्याचा आमचा संशय आहे.स्वराज्य गोमंतकचे अध्यक्ष प्रशांत वाळके म्हणाले, हा पुतळा कायदेशीर करण्यासाठी ‘स्वराज्य गोमंतक’ संस्था पुढाकार घेऊन सोपस्कार पूर्ण करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.