Goa Assembly Election: दक्षिणेतील नेते ठरवणार गोवा काँग्रेसची व्यूहरचना

Goa Assembly Election: कर्नाटकातील तीन नेते कॉंग्रेसमध्ये दाखल
Goa Assembly Election: दक्षिणेतील नेते ठरवणार गोवा काँग्रेसची व्यूहरचना
Goa Assembly Election: Congress PartyDainik Gomantak

पणजी: 2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) गोव्यातील काँग्रेस (Congress) पक्षाची निवडणूक व्यूहरचना आखण्यासाठी कॉंग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दक्षिणेतील पाच नेत्यांची निवड केली आहे. यातील चार नेते कर्नाटकातील आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची निवड करतानाच कर्नाटकातील चार नेत्यांची निवडणूक निरीक्षक व सदस्यता मोहिमेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची सर्व सुत्रे दक्षिणेतील पाच नेत्यांकडे राहणार आहेत.

Goa Assembly Election: Congress Party
Goa Election: पेडणेकरांना पोहचली बाबू ब्रॅण्डची बाटली

चिदंबरम हे आंध्रप्रदेशमधील आहेत. त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक निरीक्षकपद राहील. कर्नाटकातील राज्य कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश गुंडू राव यांची काही महिन्यांपूर्वी गोवा प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. चिदंबरम व राव हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याने या दोन नेत्यांचा दबदबा निवडणुकीपर्यंत गोवा कॉंग्रेसच्या एकूणच कामात राहणार आहे. या दोन नेत्यांसह कर्नाटकच्या विधान परिषदेचे आमदार प्रकाश काठोड, मन्सूर खान व सुनिल हणुमन्नावर यांना गोव्यात पाठवण्यात आले आहे.

यातील राठोड हे बुथ समित्या निवड व सदस्यता मोहीमेचे काम पाहात आहेत. मन्सूर खान यांच्याकडे उत्तर गोव्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून व हणुमन्नावर यांच्याकडे दक्षिण गोवा निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वरील पाचही नेते गोव्यात येत्या निवडणुकीला कॉंग्रेस पक्ष कोणत्या नियोजनासह सामोरे जाणार हे ठरवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या नेत्यांनी आपले काम सुरू केल आहे.

Goa Assembly Election: Congress Party
Goa Assembly Elections: काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे राष्ट्रवादी पेचात

राज्याबाहेरील ज्येष्ठ नेत्यांना गोव्याचे निवडणूक गोव्याचे काँग्रेसचे निवडणूक प्रभारी नेमल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होईल. काँग्रेस हा देशभर पसरलेला पक्ष असून दक्षिण - उत्तर असा भेदभाव पक्षाने कधीही केलेला नाही. पी. चिदंबरम हे माजी केंद्रीय गृहमंत्री असून दिनेश गुंडू राव हे कर्नाटकाचे माजी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आणि त्यांची काम करण्याची पद्धत गोव्यात काँग्रेसला सत्तेवर घेऊन जाईल यात तिळमात्र शंका नाही.

- अमरनाथ पणजीकर, काँग्रेस प्रवक्ते

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com