Goa Election: 'गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री बनणार'!

गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री बनेल आणि उपमुख्यमंत्रीपद ख्रिश्चन समाजाला देण्यात येईल अशी घोषणा दिल्लीचे आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केली आहे.
Goa Election: 'गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री बनणार'!
Manish SisodiaDainik Gomantak

गोव्यात (Goa) भंडारी समाजाचा मुख्यमंत्री (CM) बनेल आणि उपमुख्यमंत्रीपद ख्रिश्चन समाजाला देण्यात येईल अशी घोषणा दिल्लीचे आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केली आहे. याबरोबरच युनायटेड गोवन्स (United Govans) या धोरणानुसार राज्यातल्या सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गोव्यात आप सत्ता स्थापन करेल असे ते म्हणाले.

दरम्यान, जो पक्ष भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करण्याची घोषणा करील, त्यालाच समाजाकडून पाठिंबा दिला जाईल. राज्यात 60 टक्क्यांहून अधिक लोक हे भंडारी समाजाचे आहेत. मात्र, या समाजाचा मुख्यमंत्री करण्याबाबत अन्याय केला जात असल्याचे मत गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी अध्यक्ष अशोक नाईक यांनी, जो पक्ष भंडारी समाजाच्या अधिकाधिक उमेदवारांना जागा देईल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. मात्र, आज त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी भंडारी समाजाचाच मुख्यमंत्री करेेल त्याला पाठिंबा दिला जाईल, असे सांगितले. या समाजाकडे मुख्यमंत्री पदासाठी पात्र तसेच अनुभवी उमेदवार आहेत. या समाजाला जो पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मागे राहण्यातच समाजाचे हित आहे. या समाजाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आल्यास समाजालाही मुख्यमंत्री त्यांच्या समाजाचा करण्याची मागणी करणे सोपे होऊ शकते, असे नाईक म्हणाले.

Manish Sisodia
जो पक्ष भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करणार त्यांनाच आमचा पाठिंबा!

आमदारांचा सल्ला धुडकावला

हल्लीच केजरीवाल यांनी गोमंतक भंडारी समाजाच्या कार्यालयाला भेट दिली, तेव्हा नाईक यांनी केलेल्या राजकीय विधानामुळे भाजपच्या भंडारी समाजाच्या आमदारांनी आक्षेप घेतला होता. ज्ञातीबांधवांचा विचार करून त्यांनी विधान करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांचा हा सल्ला धुडकावून अध्यक्षांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री भंडारी समाजाचा असेल असे जो कोणी पक्ष घोषणा करील, त्यालाच पाठिंबा देऊ असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com