Goa: 3 किमीसाठी 2000 रु. भाडे! गोव्यात पर्यटकांची लूट?

31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इथले वाहनचालक अफाट गाडीभाडे लावतात. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खूप जास्त प्रमाणात भाडे लावले जाते.
In Goa drivers charge exorbitant fares.

In Goa drivers charge exorbitant fares.

Dainik Gomantak

Goa: गोवा ही निसर्गसमृद्ध राज्य असल्यामुळे देशातील आणि प्रदेशातील पर्यटकांचे ही एक आवडते ठिकाण आहे. इथे दरवर्षी अगदी वर्षभर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे गोव्याची एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळख आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यामध्ये मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत थोडी जास्त असते. यामध्ये प्रामुख्याने गोष्ट येते ती म्हणजे इथल्या प्रवासखर्चाची.

<div class="paragraphs"><p>In Goa drivers charge exorbitant fares.</p></div>
Government Job: गोवा पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभागात विविध पदांची भरती

गोव्यामध्ये पर्यटकांसाठी टुरिस्ट वाहने (Tourist Vehicle) आणि टॅक्सी (Taxi) असतात. इतर दिवशी या वाहनांचे भाडे तसे खिशाला परवडणारे असू शकते. पण 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या ( New Year) पार्श्वभूमीवर इथले वाहनचालक अफाट गाडीभाडे लावतात. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी (Tourist) खूप जास्त प्रमाणात भाडे लावले जाते. याबद्दल पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

<div class="paragraphs"><p>In Goa drivers charge exorbitant fares.</p></div>
'भाजपच्याच उमेदवारीवर निवडणूक लढवणार'

गोव्यात हा प्रकार बऱ्याचदा घडला आहे. काही दिवसांमागे सुद्धा असेच घडले. दिल्लीतील एक तरुण जोडपे 2022 मध्ये हणजूण सीमेवरील नाईट क्लबमध्ये धमाल करण्यासाठी आले होते. त्यांच्या रिसॉर्टपासून नाईट क्लब फक्त 3 किलोमीटर अंतरावर होते. या प्रवासासाठी वाहनचालकाने तब्बल 2,000 रुपये सांगितले. म्हणजे जवळजवळ 600 रुपये प्रति किमी पेक्षा जास्त खर्च. यामुळे त्यांचा पार्टी करण्याचा उत्साहच निघून गेला.

असे बरेचसे प्रकार गोव्यात पर्यटकांच्या बाबतीत घडले आहेत. शिवाय बऱ्याच महिला पर्यटकांचे असे म्हणणे आहे की इथले वाहनचालक महिलांशी उद्धतपणे वागतात. गाडीभाडे कमी करण्याबाबत चालकांशी चर्चा केली असता, ' तुम्ही नाईटक्लब, विमान तिकीटासाठी पैसे खर्च करता, मग टॅक्सीसाठी पण करावे लागेल', अशा उर्मट सुरात ते उत्तर देतात. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे सरकार लक्ष देणार का? असा सवाल आता पर्यटकवर्गातून विचारला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com