Goa Mines: आता तरी खाणी सुरू होणार का?

खाण अवलंबितांचा सवाल: सरकारने करावी तातडीने आश्‍वासनपूर्ती
Goa Mines
Goa MinesDainik Gomantak

पाळी: राज्यातील खनिज व्‍यवसाय आता सुरू होईल की नंतर या आशेतच खाण अवलंबितांची दहा वर्षे सरली आहेत. दोनवेळा खाणी बंद झाल्यानंतर मध्यंतरी केवळ दीड वर्षासाठीच खुल्या झाल्या, पण नंतरच्या काळात फक्त लिलावाचा खनिज माल किंवा स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची तेवढी वाहतूक झाली. दहा वर्षे सरली तरी अजून खाणी रीतसर मार्गाने सुरू झाल्या नसल्याने खाण भागातील अवलंबित अजूनही रोजगारासाठी चाचपडत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार आल्याने आणि सहा महिन्यांत खाणी सुरू करण्याचे आश्‍वासन खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याने निदान आता तरी खाणी सुरू होतील काय, असा सवाल खाण अवलंबित विचारत आहेत.

Goa Mines
सातेरी पंचायत पालखी उत्सव 28 मार्च पासून

राज्याला आणि केंद्र सरकारला भरभक्कम आर्थिक निधी उपलब्ध करणारा खाण व्यवसाय खाणमालकांच्या अनागोंदी कारभार आणि खाण व्यवस्थापनाच्या बेफिकीर वृत्तीमुळेच बंद पडला. न्यायालयाच्या हातोडा या खाण व्यवसायावर बसल्यानंतर खाण अवलंबितांच्या रोजीरोटीसाठी ना सरकार ना खाण कंपन्यांनी काही केले नाही. त्यामुळे मिळेल ते रोजगार पटकावण्यासाठी खाण अवलंबितांची धावपळ झाली.वास्तविक खाणींवर वीस, तीस वर्षे काम करूनही काही कामगारांना खाण कंपन्यांनी सेवेत कायम केले नाही.

Goa Mines
सातेरी पंचायत पालखी उत्सव 28 मार्च पासून

त्यामुळे रोजंदारीवर असलेल्या सुमारे पाच हजार खाण कामगारांवर तर बेकारीची मोठी कुऱ्हाड कोसळली आणि त्यातून अजून खाण कामगार सावरलेला नाही. विशेष म्हणजे खाणींवर दिवस काढून आणि तुटपुंज्या पगारावर काम करून खाण अवलंबितांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले, उच्च शिक्षित केले तरी त्यांच्या रोजगाराची हमी अजून सरकार देत नाही की अन्य कुणी. आता पुन्हा एकदा केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्याने आणि जाहीरनाम्यात थेट आश्‍वासन दिल्याने निदान यावेळेला तरी खाण अवलंबिताना दिलासा मिळेल काय, असा सवाल केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com