गोव्यात भाजीपाला,मासळी महागाईच्या वाटेवर..!

कोल्हापूर आणि बेळगाव बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर 20 रुपयांच्या आसपास तर बटाट्याचा दर 7 रुपयांपासून 12 रुपयांच्या दरम्यान असताना गोव्यात कांद्याचा दर 50 रुपयांहून अधिक तर बटाट्याचा दर 30 रुपयांहून अधिक आहे.
गोव्यात भाजीपाला,मासळी महागाईच्या वाटेवर..!

In Goa vegetables and fish prices are on the rise

Dainik GomantaK

Panaji: भाजीपाल्यांच्या आणि माशांच्या दरात नेहमीच चढाओढ सुरू असते. कोकण आणि गोव्यासाठी कोल्हापूर, बेळगाव आणि परिसरातून भाजीपाला रोज येत असतो. कोल्हापूर आणि बेळगाव बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर 20 रुपयांच्या आसपास तर बटाट्याचा दर 7 रुपयांपासून 12 रुपयांच्या दरम्यान असताना गोव्यात कांद्याचा दर 50 रुपयांहून अधिक तर बटाट्याचा दर 30 रुपयांहून अधिक आहे.

<div class="paragraphs"><p>In Goa vegetables and fish prices are on the rise</p></div>
गोव्यात 'कोविडची' तिसरी लाट.. तज्ज्ञांचा इशारा!

राज्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर 100 रुपयांच्या वर गेल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे. भाजीपाल्याबरोबर मासळी आणि चिकनच्या दरानेही या महागाईला साथ दिली आहे. भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याविषयी व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता पर्यटन हंगाम असल्याने मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे दर वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे. अचानक पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारपेठांमध्येच भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे खुल्या बाजारपेठेतील किमतीही वाढल्या आहेत.

मांसाहाराच्या किमती:

 • बांगडे 200 रु.

 • पापलेट 700 रु.

 • कोळंबी 400 रु.

 • चिकन 140 रु.

 • मटण 700 रु.

 • अंडी 70 रु.

  भाजीपाल्याच्या किमती:

 • टोमॅटाे 60 रु.

 • बटाटा 40 रु.

 • कांदे 50 रु.

 • भेंडी 120 रु.

 • वांगी 120 रु.

<div class="paragraphs"><p>In Goa vegetables and fish prices are on the rise</p></div>
मांद्रेत सूर्योदयापर्यंत चालल्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या

भाजीपाल्याला जेवढी मागणी असते तेवढीच मागणी चिकन आणि मटण यांनाही असते. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी पार्ट्या होत असल्याने माेठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. मासे आणि अंडी यांचीही मागणी वाढल्याने गोमंतकीयांसमोर पेच निर्माण झाला आहे. मासे हे बहुतेक गोवेकरांच्या जेवणातील नेहमीचा पदार्थ आहे. मात्र, त्यांचेही दर आवाक्याबाहेर गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com