पिळगाव भागात वायंगण शेतीची लगबग शेतजमिनीची मशागत सुरु, तरव्याची पेरणी!
PiligaoDainik Gomantak

पिळगाव भागात वायंगण शेतीची लगबग शेतजमिनीची मशागत सुरु, तरव्याची पेरणी!

चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पिळगावात वायंगण शेती लागवडीची कामे सुरु होणार.

डिचोली : खरीप भातपिक घेतल्यानंतर डिचोलीतील पिळगाव (Piligao) भागात आता वायंगण शेतीची लगबग सुरु झाली आहे. सध्या पिळगावात शेतजमिनीची मशागत सुरु असून, शेतकऱ्यांनी पेरलेला तरवाही रुजून वर आला आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पिळगावात वायंगण शेती लागवडीची कामे सुरु होणार असल्याचे संकेत आहेत.

Piligao
गोव्यात ‘रोझरी’चे फेस्त उत्साहात

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात (Scope of Agriculture Office) येणाऱ्या पिळगावसह मये, बोर्डे, धुमासे-मेणकूरे, कुडचिरे आदी ठराविक भागात अजूनही पारंपरिक वायंगण शेती लागवड करण्यात येते. पैकी अन्य भागांच्या तुलनेत पिळगावात एक ते दीड महिनाअगोदरच वायंगण शेती लागवडीची कामे हाती घेण्यात येतात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर पिळगावात पाण्याची टंचाई निर्माण होत असते.

त्यामुळे खरीप भातपिक घेतल्यानंतर लगेचच शेतकरी वायंगण शेतीच्या कामाकडे वळतात. अशी माहिती काशिनाथ पेडणेकर आणि अन्य शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान, ऐन कापणीच्यावेळी पावसाने कहर केला असतानाही त्यामानाने पिळगावात खरीप भातपिक समाधानकारक आल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com