Sanguem IIT: केंद्राचा राज्य सरकारला दणका; सांगेतील आयआयटीचे स्थलांतर होणार?

केंद्रीय शिक्षण खात्याची माहिती, स्थानिकांना कळवले
Sanguem IIT land
Sanguem IIT landDainik Gomantak

Panjim : राज्य सरकारकडून सांगे येथे आयआयटी उभारण्यासाठीच्या प्रयत्नांना कायमचा ब्रेक लागला आहे. केंद्रीय शिक्षण खात्याने राज्य सरकारकडून सीमांकीत केलेली जमीन या प्रकल्पासाठी विचारात घेतली नसल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसली असून स्थानिकांमध्ये खुशीचे वातावरण आहे. दुसरीकडे, या पत्रामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

Sanguem IIT land
Goa : आप, टीएमसी विरोधात 'या' कारणामुळे 13 गुन्हे दाखल

गेल्या अनेक वर्षांपासून आयआयटी गोवासाठी कायमस्वरूपी स्थळ शोधण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सांगे, काणकोण, वाळपई आणि पुन्हा सांगे असा प्रवास करणाऱ्या या शिक्षण प्रकल्पासाठी सांगे तालुक्यातील कोटार्ली परिसरातील जमीन राज्य सरकारने स्थानिकांचा विरोध डावलून सीमांकीत करीत तसा अहवाल केंद्राकडे पाठवला होता. याला या भागातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करत आमरण उपोषण चालू ठेवले होते. यासंबंधी नागरिक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार सुरू होते.

दरम्यान, याबाबतच स्थानिक कार्यकर्ते कोंतान्सियो मास्करेन्हास आणि इतरांनी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाला जमिनीसंदर्भात विचारणा केली होती. यावर शिक्षण खात्याचे अप्पर सचिव कविता चौहान यांनी यासंदर्भातील माहिती देत राज्य सरकारकडून विचारात असलेली आणि सीमांकन करून अहवाल सादर झालेली जमीन या प्रकल्पासाठी योग्य नसल्याचे पत्र या शेतकऱ्यांना पाठवले आहे. यावरून सांगेत आयआयटी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

Sanguem IIT land
Goa Police : पेडणे पोलिसांची धडक कारवाई; सापळा रचत ड्रग्स विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या

फळदेसाई यांचे प्रयत्न निष्फळ

हा प्रकल्प सांगे भागात व्हावा यासाठी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. आयआयटीच्या बाजूने जनमत तयार करत आंदोलकांना अनेकवेळा विरोध केला होता. तरीही या भागातील शेतकऱ्यांनी धरणे, मोर्चा, संवाद आणि पत्रकार परिषदा घेऊन आपला विरोध कायम ठेवला होता. या आंदोलकांच्या प्रयत्नाला आता यश मिळत आहे, तर फळदेसाई यांचे प्रयत्न निष्फळ होताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com