Calangute: कळंगुट ग्रामसभेत 'हे' विषय गाजले, पंचायतीने लिहिलेय मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना पत्र

बागा नदीतील प्रदूषण रोखा- ग्रामस्थ
Calangute
CalanguteDainik Gomantak

Calangute सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कळंगुट पंचायतीच्या सर्वसाधारण ग्रामसभेत बागा नदीचे प्रदूषण, मसाज पार्लर, डान्स बार, सूचना फलक उभारणे व त्यांची देखभाल, टाऊट्स आदी विषयांवर चर्चा झाली.

या ग्रामसभेत 'सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने बागा नदीच्या प्रदूषणा'बाबत ग्रामस्थांनी पंचायतीला प्रश्न विचारला. यावेळी सरपंच जोसेफ यांनी सांगितले की, पंचायतीने आधीच एसटीपीचे (मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प) कामकाज थांबवण्यास सांगितले आहे.

याविषयी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पर्यावरण मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. तसेच कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांनाही लिहिले. कारण हा प्रकल्प सांडपाणी नव्हे, तर रासायनिक कचरा नदीत सोडत आहे.

Calangute
Needs To Change: परिवर्तनाची निकड...

टाऊट्सच्या प्रश्नावर सरपंच म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हा मुद्दा मांडला असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. विविध ठाण्यांचे पोलिस येऊन कारवाई करत आहेत. ठिकठिकाणी लावलेले सूचनाफलक योग्य नाहीत.

त्यांची देखभाल होत नसल्याने गैरसोय होत असल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावर सरंपच म्हणाले की, सीएसआर योजनेअंतर्गत पंचायतीला एक संस्थेकडून मदत मिळाली आहे. ते पंचायत कार्यक्षेत्रात फलक लावून त्यांची देखभाल करणार आहेत.

...अन्यथा परवाना रद्द

पंचायतीच्या हद्दीत चालणारे मसाज स्पा, डान्स बार यावर कारवाई करण्याबाबत एका ग्रामस्थाने पंचायत मंडळास प्रश्न केला.

यावर सरपंच म्हणाले की, योग्य प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि संबंधितास आरोग्य व इतर विभागांकडून एनओसी मिळत नाही, तोपर्यंत पंचायत परवाना देत नाही.

आम्ही संबंधित मालकांकडून प्रतिज्ञापत्रही घेत आहोत की, येथे कोणतीही बेकायदेशीर गोष्ट केली जाणार नाही. तसे आढळल्यास परवाना रद्द केला जाईल, असे सिक्वेरा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com