Mopa Airport| पहिल्या टप्प्यात गोव्यातून देशातील 17 ठिकाणी सरळ उड्डाण करता येणार

पहिले विमान उतरले; रन-वे चाचणी यशस्वी
Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Mopa International Airport | Goa Marathi News | Goa NewsDainik Gomantak

पेडणे: मोपा विमानतळावर आज सोमवारी सकाळी सव्वाअकरा दरम्यान पहिले विमान उतरले. मुंबईहून सकाळी सव्वादहा वाजता निघालेले इंडिगो कंपनीचे ‘6-इ-9001’ हे विमान कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना घेऊन निघाले होते. मोपाची धावपट्टी ही विमानांचे टेक ऑफ करण्यासाठी योग्य आहे की नाही याबाबतची चाचणी जुलै महिन्यात झाली होती. तेव्हा मोपाच्या धावपट्टीवरून विमानाने यशस्वीपणे टेक ऑफ केले होते. त्यानंतर आता विमानाचे यशस्वी लँडिंगही झाले आहे. ही चाचणी नागरी वाहतूक संचानलयाच्या देखरेखीखाली पार पडली.

(In first phase, direct flights can be made to 17 places in country in mopa airport)

Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Suella Fernandes: ब्रिटनच्या पुढील गृहमंत्री सुएला फर्नांडिस यांचे गोव्याशी आहे विशेष नाते

पेडणे तालुक्यातील ‘मोपा’चे काम ९० टक्क्यांहून पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची धावपट्टी तसेच अन्य बांधकाम देखील पूर्णतत्वाकडे पोहचले आहे. या विमानतळावरील धावपट्टी ही विमान उतरवण्यासाठी योग्य आहे का? त्यात कुठलीही तांत्रिक अडचण तर नाही ना याची चाचणी सोमवारी सकाळी घेण्यात आली. ‘मोपा’वर हे पहिले विमान उतरताच तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमान उतरलेल्या ठिकाणी धाव घेऊन अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या ‘रन-वे’ची, तसेच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Mopa Airport|वास्‍तव! मोपा विमानतळाला अजून चार महिन्यांचा अवकाश

या पाहणीचा अहवाल दिल्यानंतर दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून मोपा विमानतळाला विमान उड्डाण आणि लँडिंग करण्यासाठी परवाने मिळणार आहेत. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात 17 ठिकाणी सरळ उड्डाण

मोपा विमानतळ सुरू झाल्यास पहिल्या टप्प्यात देशातील 17 ठिकाणी सरळ उड्डाण करता येतील. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूर, नागपूर, हैदराबाद, चेन्नई, कोचीन, कोलकता, लखनऊ ,चंदीगड, अहमदाबाद आदींचा समावेश आहे. तर या विमानतळावरून सरळ 12 आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर विमान उड्डाण होईल. यात अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंग्लंड, रशिया आणि मध्य आशियाई व युरोपमधील काही देश यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com