
एटीएम मध्ये आपले लक्ष दुसरीकडे वळवून आपल्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून एका अज्ञात व्यक्तीने खात्यातून एक लाख पंधरा हजार रुपये काढल्याची तक्रार फ्रान्सिस्को जुआंव फर्नांडिस यांनी वास्को पोलिस ठाण्यात केली. याप्रकरणी वास्कोचे उपअधीक्षक सलिम शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयुर सावंत तपास करीत आहेत.
फर्नाडिस हे 20 डिसेंबरला दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान वास्कोतील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी एटीएमध्ये असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून हातचलाखी करून त्याचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर वेगवेगळ्या पाच ठिकाणी व्यवहार करून त्यांच्या खात्यातील रक्कम काढली.
फसल्याचे लक्षात आल्यावर फर्नांडिस यांनी पोलिसांत धाव घेतली.
एका महिलेची बनावट कागदपत्रे तयार करून व ती बँकेत सादर करून कर्ज घेतल्या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस स्थंलात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
शोभन गावकर व मनोच कानोलकर अशी संशयितांची नवे असून या प्रकरणी सत्यवती कानोलकर यांनी कुंकळ्ळी पोलीस स्थंलात तक्रार दाखल केली आहे . वरील दोघांनी 2020 मध्ये आपले फोटो घेतले आणि आपली बनावट कागदपत्रे तयार करून ती एका बँकेत सादर केली आणि 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे .
या प्रकरणी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक महेश नाईक पुढील तपास करीत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.