उच्च न्यायालयाच्या इमारतीचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या हस्ते उद्‍घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

र्वरी येथील नव्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाचे सुमारे 62 न्यायमूर्ती आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पर्वरी:  पर्वरी येथील नव्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. केंद्रीय कायदामंत्री रवी शंकर प्रसाद व सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती व मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाचे सुमारे 62 न्यायमूर्ती आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम सुरू होते ते आता पूर्णत्वास आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपानकर दत्ता, गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती महेश सोनक, ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम, कायदामंत्री नीलेश काब्राल व इतर महनीय व्यक्ती उपस्थित होते. या उद्‍घाटनाच्या काळात तेथील रस्त्यांच्या बाजूने वाहने उभी करून ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या नव्याने बांधण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये सात न्यायालय सभागृहे आहेत. या दुमजली इमारतीचे बांधकाम गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने केले आहे. या इमारतीमध्ये रेकॉर्ड वाचनालय, लेखा, शिष्टाचार, परिषद सभागृह तसेच इतर विभाग आहेत. याव्यतिरिक्त न्यायमूर्तींसाठी व रजिस्ट्रार तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालये आहेत.

 

संबंधित बातम्या