क्रीडा धोरणाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ - आजगावकर

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 मार्च 2021

खेळात निपुण असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात क्रीडा धोरणाचा चांगला लाभ मिळत असून याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातून चांगले खेळाडू तयार होऊ लागले आहेत, असे उद्गार उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी येथे काढले.

मडगाव : खेळात निपुण असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात क्रीडा धोरणाचा चांगला लाभ मिळत असून याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातून चांगले खेळाडू तयार होऊ लागले आहेत, असे उद्गार उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी येथे काढले. फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर व सबज्युनियर सॅपेकटाकरो राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री व ऊारतीय सॅपेकटाकरो महासंघाचे चेअरमन बाबू कवळेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरु वरुण साहनी, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा, क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, सॅपेकटाकरो महासंघाचे अध्यक्ष डाॅ. एस. आर. प्रेमराज उपस्थित होते. 

मडगाव आणि केपे पालिका निवडणूक आप लढवणार - राहुल म्हांबरे 

क्रीडा धोरणामुळे शिक्षणात गुण मिळत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळात रुची घेऊ लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातूनही चांगले खेळाडू पुढे येत आहेत. गोव्यात चांगले परिणाम दिसून आल्याने इतर राज्यांनीही क्रीडा धोरण राबवून शिक्षण व खेळात प्रगती साधावी असे आवाहन आजगावकर यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्यात उच्च दर्जाच्या पायाभूत क्रीडा सुविधांचा विकास झाला आहे. या क्रीडा सुविधांचा गोव्याती खेळाडुंनी लाभ घेऊन खेळात पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. 

गोव्यात दहा वर्षांची परंपरा कायम; हूनर हाटमध्ये हस्तकला, पाककृती आणि संस्कृतीचा...

सॅपेकटाकरो खेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कवळेकर यांनी कार्यक्रमा स्वागत केले. सॅपेकटाकरोचे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन उत्तम रितीने करण्यात आले असून खेळाडुंनी या स्पर्धेत चांगल्या कामगरीचे दर्शन घडवावे असे कवळेकर यांनी सांगितले. गोव्यात खेळाडुंसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असून याचा केजी ते पीजी स्तरापर्यंतच्या खेळाडुंना लाभ मिळत आहे. त्यामुळे गोव्यात खेळ संस्कृती विकसित झाली आहे, असे साहनी यांनी सांगितले. सॅपेकटाकरो हा चांगला खेळ असून गोवा पोलिसांमध्ये या खेळाची रुची निर्माण व्हावी यासाठी पोलिस खाते प्रयत्न करणार आहे, असे मीणा यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या