मानगाळमध्ये कदंब बस सेवेचे उद्‌घाटन

kadamba bus.jpg
kadamba bus.jpg

सांगे: सांगे मतदारसंघाचा भाग असलेल्या अतिशय दुर्गम अशा मानगाळ (Mangal) गावाला मुख्य प्रवाहाशी जोडणारी एकमेव बससेवा (Transportation Service) जेव्हा गेल्या वर्षी कोविड काळात बंद पडली. तेव्हा या गावातील जनतेचे अतोनात हाल झाले. मानगाळ हा गाव नेत्रावळी या अभयारण्याचा भाग आहे. गाव डोंगरावर असल्याने बससाठी गावातील वृद्धांना, आजारी व्यक्तींना म्हातारी कोतारी तसेच आजारी व्यक्तींना 8 किमी पायपीट करताना अतोनात हाल व्हायचे, अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Chandrakant Kavlekar) आणि सावित्री कवळेकरांकडे गावकऱ्यांनी  ही कैफियत मांडली. त्यानंतर त्वरित ही समस्या सोडविण्यासाठी कवळेकरांनी प्रयत्न केल्यानंतर येथून बससेवेला सुरवात केली. (Inauguration of Kadamba bus service in Mangal)

उद्‍घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, आमदार प्रसाद गांवकर, गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष खुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई,  सरपंच समीक्षा देसाई, पंच संदीप मळकर्णेकर, टोळयो वेळीप, कदंबाचे जनरल मॅनेजर संजय घाटे, व्हिजन सांगेच्या संयोजक सावित्री कवळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले, खेडोपाडी बससेवा सुरू करून सरकार नफा कमावत नसून गावकऱ्यांच्या सेवेसाठी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. महामंडळाने ही बस सेवा कायम सुरू ठेवावी. कारण ग्रामीण भागातील लोकांसाठी कदंब बससेवा उपयोगी आहे.

यावेळी आमदार प्रसाद गांवकर, सुभाष फळदेसाई आणि कदंबाचे जनरल मॅनेजर, संजय घाटे यांची भाषणे झाली. घाटे यांनी कदंब महामंडळातर्फे अशा दुर्गम भागात चालणाऱ्या अनेक गाड्यांविषयी विस्ताराने माहिती दिली. प्रतिभा सुधाकर वेळीप यांनी बस सेवा सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com