दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणाऱ्या क्रूज जहाजचे उद्घाटन संपन्न

मंत्री, व्यापार आणि उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी एमपीटीची क्षमता वाढवण्यासाठी विविध भागधारकांशी चर्चा होणार
"रिव्हर क्रूझ सर्व्हिसेस" चे उद्घाटन
"रिव्हर क्रूझ सर्व्हिसेस" चे उद्घाटनDainik Gomantak

वास्को: राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय बंदर, जहाज (ship) आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarvanand Sonowal) यांनी मुरगाव बंदराला भेट देऊन यावेळी त्यांनी दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणाऱ्या क्रूज जहाज सेवेचे उद्घाटन केले. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, एमपीटीचे चेअरमन राजीव जलोटा व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गोव्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रात अनेक उत्तम पावले उचलली. त्यामुळेच हे राज्य देशातील विकसित राज्य बनले आहे. राज्यात भविष्यात 1 हजार कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. गोमंतकीय जनतेला विश्वासात घेऊनच हे प्रकल्प पुढे नेले जातील' असे त्यांनी सांगताना राज्याच्या पर्यटन क्षेत्राचा विकास होत आहे. केंद्र सरकारसाठी गोवा महत्त्वाचे राज्य आहे. जेवढे हे राज्य शक्तिशाली बनेल, तेवढाच देश शक्तिशाली होईल असे ते म्हणाले. मुरगाव बंदराचा उत्तम विकास व्हावा यासाठी विविध पावले उचलण्यात येणार आहेत.आजची ही क्रूज जहाज सेवा नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वासही मंत्री सोनोवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

"रिव्हर क्रूझ सर्व्हिसेस" चे उद्घाटन
आम आदमी पार्टी गोव्यात तृणमूल सोबत युती करणार नाही

मंत्री, व्यापार आणि उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात (economic development) योगदान देण्यासाठी एमपीटीची क्षमता वाढवण्यासाठी विविध भागधारकांशी चर्चा करतील. जलमार्ग असो, हवाई मार्ग असो वा रेल्वेमार्ग असो, जोडण्याची सर्व साधने एकत्र आणून त्यांनी व्यापाराच्या उद्देशाने आपली भूमिका एकजुटीने बजावली किंवा लोकांना योग्य वेळी सोयीसुविधा दिल्या तर राज्याची अर्थव्यवस्था निश्चितच बळकट होईल असे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.

श्रीपाद नाईक यांनी बोलताना खाण व्यवसाय बंद झाल्याने आणि कोळसा हाताळणीच्या प्रमाणावर निर्बंध आल्यानंतर मुरगाव बंदराची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलण्यास प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी तोडगा निघेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यादरम्यान, त्यांनी विजय मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संचालित "रिव्हर क्रूझ सर्व्हिसेस" चे उद्घाटन केल्यानंतर बंदराच्या कार्यान्वित क्षेत्रांना भेट दिली. विशेषत: क्रूझ टर्मिनल बर्थ जेथे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल उभारले जाणार आहे आणि पी पी पी टर्मिनल्स, साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेड, आणि अदानी मुरमुगाव पोर्ट ट्रस्ट प्रा. लि. ऑपरेशन्सची पाहणी केल्यानंतर स्टेक होल्डर्स आणि स्थानिक कार्यकर्त्यांसोबत एक बैठक देखील घेतील आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com