Canacona News : सामाजिक जागृतीसाठी नाट्यकला प्रभावी माध्‍यम : राजू नायक

महालवाडा-पैंगीण येथे फ्लेमिंगो थिएटरतर्फे आयोजित नाट्यशिबिराचे उद्‌घाटन
drama camp organized by Flamingo Theatre
drama camp organized by Flamingo TheatreDainik Gomantak

फ्लेमिंगो थिएटरने राजकारण व समाजकारण याबाबत जनजागृती करण्यासाठी नाटकाचा वापर करणे आज काळाची गरज आहे, असे मत ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले. महालवाडा-पैंगीण येथील श्री परशुराम नृसिंह देवस्‍थानात फ्लेमिंगो थिएटरतर्फे आयोजित नाट्यशिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

drama camp organized by Flamingo Theatre
Gomantak Summer Camp: बालभवन,पणजी येथे 14 मे रोजी ‘गोमन्तक’ समर कॅम्प

यावेळी पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगीणकर, उदय प्रभुगावकर यांचीही उपस्‍थिती होती. नायक पुढे म्‍हणाले की, "माणूस घडविण्याचे काम नाटक करते. आज मीडिया सामान्य माणसांची व्यथा मांडण्यास असमर्थ ठरत आहे. प्रत्येक गोवेकराच्या मनात नाटकाबद्दल ओढ अजूनही आहे."

"भाषा कशी बोलावी, भाषाफेक कशी करावी हे शाळा, महाविद्यालयात शिकवले जात नाही. फक्त सर्वाधिक गुण कसे घ्यावेत, हे शिकविले जाते. सर्व गुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्‍याची प्रक्रियाच आज शिक्षण संस्थांतून बंद झाली आहे," अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्त केली.

प्रारंभी सिद्धराज मोपकर यांनी इशस्तवन सादर केले. शिक्षक कवींद्र फळदेसाई यांचीही यावेळी उपस्थिती होती. श्रेया प्रभू, श्रुती खोर्जुवेकर, प्राजक्ता, मनीषा यांनी मान्‍यवरांना पुष्‍प देऊन स्वागत केले.

drama camp organized by Flamingo Theatre
Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळ झाले अत्याअधुनिक, अशी सुविधा वापरणारे आशिया खंडातील ठरले पहिलेच विमानतळ

नाटक सामान्यांपर्यंत पोचविणार

अपारंपरिक नाट्यसंकल्पनेची जोपासना पूर्वी छंद म्हणून केली जायची. नाटक प्रेक्षकांना आपल्या निश्चितस्थळी बोलावत होते. मात्र आम्ही ही संकल्पना बदलून बादल सरकार यांच्या मतप्रणालीप्रमाणे सामान्यांचे विषय घेऊन नाटक सामान्यांपर्यंत पोचविण्याचा चंग बांधला आहे.

बादल सरकार यांची नात ऋतुजा सरकार यांनी आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी रंगमंच या संकल्पेनेला बगल देऊन ‘आंगण मंच’ ही नवी संकल्पना रुजवून वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक प्रश्नांवर लोकजागृती केल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com