Goa News |
Goa News |Dainik Gomantak

Goa News: पाटो परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण

पाटो परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याने उभा केलेला दोन एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

Goa News: पाटो परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याने उभा केलेला दोन एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी महापौर रोहीत मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, साबांखाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम पार्सेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटो परिसरात एलआयसीच्या समोर दक्षिणेला सांबाखाने हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे पाटो परिसरातली सांडपाण्यावर आता प्रक्रिया होणार आहे.

यापूर्वी पाटो परिसरातील काही प्रमाणात सांडपाणी सांतिनेज येथील प्रक्रिया प्रकल्पात आणले जात होते. आता या प्रकल्पामुळे या परिसरातील सर्व सांडपाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. त्याशिवाय मळ्यातीलही सांडपाणी या प्रकल्पात आणले जाणार आहे.

Goa News |
Mahadayi Water Dispute: म्हादई आंदोलनाला सर्वपक्ष एकवटले; भाजपचा याला पाठिंबा आहे का ?

जी-20मुळे डांबरीकरण होणार

जी-20च्या बैठकांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नोडल ऑफिसरची नेमणूक केली आहे. नोडल ऑफिसरने आपल्याकडून सही घेतली आहे. रस्ते व इतर कामे करण्याचे काम या अधिकाऱ्याकडे आहे.

पणजीतील रस्त्यांचे जी-20 मुळे डांबरीकरण होणार आहे. या बैठका संपल्यानंतर पुन्हा स्मार्ट सिटी व इतर उर्वरित कामे केली जातील. त्यासाठी रस्ते पुन्हा खोदावे लागतील. पुन्हा रस्ते करायचे असल्याने खर्चही वाढणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com