माविन गुदिन्हो यांच्याहस्ते झुआरीनगर येथे पाणी पुरवठा वाहिनीचा शुभारंभ

झुआरीनगर येथील उपासनगर ते उमीया हॕबिटेट सहकारी गृह सोसायटी पर्यंत पाणी पुरवठा करणारी नविन वाहिनी (Water Pipeline)टाकण्याचा शुभारंभ गोवा राज्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Minister Mauvin Godinho) यांच्याहस्ते करण्यात आला.
माविन गुदिन्हो यांच्याहस्ते झुआरीनगर येथे पाणी पुरवठा वाहिनीचा शुभारंभ

Minister Mauvin Godinho

Dainik Gomantak

वास्को: झुआरीनगर येथील उपासनगर ते उमीया हॕबिटेट सहकारी गृह सोसायटी पर्यंत पाणी पुरवठा करणारी नविन वाहिनी (Water Pipeline)टाकण्याचा शुभारंभ गोवा राज्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Minister Mauvin Godinho) यांच्याहस्ते आणि सांकवाळ पंचायतीचे सरपंच गिरिष पिल्ले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

<div class="paragraphs"><p>Minister Mauvin Godinho</p></div>
वेर्णा परिसरात धावत्या कारचा भीषण अपघात

उमीया हॕबिटेट सहकारी गृह सोसायटीच्या परिसरात आयोजित केलेल्या एका समारंभात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वढवून हा शुभारंभ करण्यात आला.झुआरीनगर येथील उपासनगर ते उमीया हॕबिटेट सहकारी गृह संस्था हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने आणि या भागातील नागरिकांची पाण्यासाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या भागात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD) पाणी पुरवठा विभागातर्फे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने पावले उचलली होती. या कामासाठी सुमारे 56 लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर महालक्ष्मी रेझिडेन्सि, उपासनगर, क्वीनिनगर, उमिया हॕबिटेट कॉलनी धरुन सभोवतालच्या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

याप्रसंगी उमिया हॕबिटेट कॉलनीच्या परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलाताना पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्डाणा यांच्या निष्क्रियतेमुळे याभागातीला रहिवाशांना गेली साडेचार वर्षे पाण्यापासून वंचित रहावे लागले. आणि भविष्यात नागरिकांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी येत्या निवडणुकीत (Goa Elections 2022) गिरिष पिल्ले सारख्या धडाडिच्या उमेदवारास निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Minister Mauvin Godinho</p></div>
बार्देश बझार अध्यक्षपदी धर्मा चोडणकर, रमाकांत खलप यांच्या सुपुत्राचा पराभव

यावेळी जिल्हा पंचायत सदस्या अनिता थोरात, सरपंच गिरिष पिल्ले, पंच आरिष कादर व समाज कार्यकर्ते गजा गांवस यांची समयोचित भाषणे झाली. कार्यकारी अभियंते विश्वाभंर भेंडे यांनी उपस्थितांना या कामाची माहिती दिली. मान्यवरांसह पंच सतीश पडवलकरं, गोविंद लामाणी, परशु दोडामणी, उमिया हॕबिटेटचे रहिवाशी मंजीनाथ गांवकर, अनिल चोडणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरावातीस उमिया हॕबिटेट संस्थेचे अध्यक्ष सुनील गांवस यांनी सर्वांचे स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त केले. गिरिष बोरकर यांनी या कार्यक्रमाचे सुत्र संचलन केले तर शेवटी जगदीश यादव यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास झुआरीनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.