ऑनलाईन पुरोहित वर्गाचे देशविदेशातून उद्‍घाटन

संजय घुग्रेटकर
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

सनातन वैदिक हिंदू धर्म अत्यंत प्राचीन आहे. श्रेष्ठ अशा ऋषिमुनींनी तपश्चर्या करून जे शुद्ध ज्ञान तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोचवले, त्या ऋषिमुनींनी दिलेली ही देणगी आहे. या हिंदू धर्मामध्ये होणारे उत्सव, संसाराची बसलेली बैठक ही सगळी ऋषिमुनींनी दिलेली आहे. विश्वभर कोविड - १९ चा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

खांडोळा

सनातन वैदिक हिंदू धर्म अत्यंत प्राचीन आहे. श्रेष्ठ अशा ऋषिमुनींनी तपश्चर्या करून जे शुद्ध ज्ञान तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोचवले, त्या ऋषिमुनींनी दिलेली ही देणगी आहे. या हिंदू धर्मामध्ये होणारे उत्सव, संसाराची बसलेली बैठक ही सगळी ऋषिमुनींनी दिलेली आहे. विश्वभर कोविड - १९ चा प्रादुर्भाव वाढलेला आहे. सर्व व्यवस्था देखील ठप्प झालेल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या काळात पुरोहित घरोघरी पोहचू शकत नाहीत. गेली अनेक वर्षे आपल्या घरी पुरोहित पूजा संपन्न करण्यासाठी येतात. पण या वर्षी महामारीमुळे पुरोहितांना घरी येणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाइन माध्यमातून पौरोहित्य शिका, असे संबोधन ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी देश-विदेशात एकाच वेळी ऑनलाईन पुरोहित वर्गाच्या उद्‍घाटन प्रसंगी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्‌गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने धर्मसेवेच्या माध्यमातून ऑनलाइन पौरोहित्य वर्ग भारतात प्रारंभ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर युएईमध्ये इंटनॅशनल सद्‍गुरू फाउंडेशन युएई काउंसिलतर्फे "ऑनलाइन पौरोहित्य वर्ग" श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक - डॉ. स्वप्निल नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ झाला आहे. या पुरोहित वर्गाचे उद्‍घाटन भारतातून आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, रोम इटलीहून योगमहामंडलेश्वर शिवानंद सरस्वती तसेच युएईत इंटरनॅशनल सद्‍गुरू फाउंडेशन काऊन्सिल अध्यक्ष डॉ. स्वप्निल नागवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन करण्यात आले.
दुबईत ऑनलाइन पौरोहित्य व्यवस्था प्रकाश परब सांभाळतात. श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्‌गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या आशीर्वादाने इंटरनॅशनल सद्‌गुरू फाउंडेशन्स, युएई काऊन्सिलतर्फे "ऑनलाईन गणपती पूजा वर्ग" सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन पुरोहित वर्गाला भारतातून ५०० हून अधिक हिंदू धर्मीय प्रशिक्षण घेत असून, दुबईत प्रारंभ झालेल्या वर्गाला ५० हून अधिक हिंदू धर्मिय सहभागी झाले आहेत.
या वर्गाच्या उद्‍घाटन प्रसंगी श्री दत्त पद्मनाभ पीठ, संचालिका ॲड. ब्राह्मी देवी यांनी प्रस्तावना केली. संचालक श्री रामचंद्र नाईक यांनी आभार व्यक्त केले.
तंत्रज्ञातील तज्ञ व गुरुपीठाच्या टेक्नॉलॉजीचे प्रमुख फोंडू अश्वेकर यांच्या मार्गदर्शनाने ही ऑनलाइन सेवा सुरू आहे. दुबईतील या वर्गाला शिक्षक म्हणून यजुर्वेदाचार्य विष्णू हे अध्यापन करणार आहेत.

संपादन ः संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या