सांगे पालिका गेस्ट हाऊसचे उद्‌घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

सांगे नगरपालिकेने सुवर्णमहोत्सवी निधीतून बांधलेल्या पालिका गेस्ट हाऊसचे उद्‌घाटन आज होणार असून, पालिका मंडळाची मुदत चार नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आहे त्याच परिस्थितीत उद्‌घाटन करण्याची सूचना केली असल्याची माहिती नगराध्यक्ष केरोज क्रुझ यांनी दिली. 

सांगे :  सांगे नगरपालिकेने सुवर्णमहोत्सवी निधीतून बांधलेल्या पालिका गेस्ट हाऊसचे उद्‌घाटन आज होणार असून, पालिका मंडळाची मुदत चार नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आहे त्याच परिस्थितीत उद्‌घाटन करण्याची सूचना केली असल्याची माहिती नगराध्यक्ष केरोज क्रुझ यांनी दिली. 

दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पालिका मंत्री मिलिंद नाईक, वीजमंत्री निलेश काब्राल, आमदार प्रसाद गावकर यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता उदघाटन सोहळा होणार आहे.

यावेळी खास उपस्थिती पालिका संचालक डॉ. तारिक थॉमस, माजी आमदार सुभाष फळदेसाई, नगराध्यक्ष केरोज क्रुझ, उपनगराध्यक्ष प्रकाश गावकर, त्याचबरोबर नगरसेवक रोजमारिया फर्नांडिस, रुमाल्डो फर्नांडिस, अमिता मापारी, फौझिया शेख, कायतांन फर्नांडिस, सूर्यदत्त नाईक, संजय रायकर, संदेश कोसंबे, पालिकाधिकारी मनोज कोरगावकर व पालिका अभियंता सुहास फळदेसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष केरोज क्रुझ यांनी दिली आहे. 

आमदार गावकर यांचा कार्यक्रमाला आक्षेप 
पालिका ‘गेस्टहाऊस’चे उद्‌घाटन करीत आहे, ही चांगली गोष्ट. पण, याची तयारी महिनाभर पूर्वीच करायला हवी होती. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या काळात सुवर्णमहोत्सवी योजनेअंतर्गत एक कोटी रुपये दिले होते व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. पण, आज कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना केवळ घाई गडबडीत उद्‌घाटन केले जात आहे. किचन रूममध्ये कोणतीही सुविधा नाही, फर्निचर नाही, पाण्याची कनेक्शन नाही, इतकेच नसून, पालिकेने निमंत्रण पत्रिकेत शिष्टाचार सोडून माजी आमदार सुभाष फळ देसाई यांचे नाव घातले आहे. मग वासुदेव मेंग गावकर यांचे नाव का नाही? काणकोणला होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्यात सरकारात असून देखील माजी मंत्री रमेश तवडकर यांचे नाव का घातले जात नाही. यापूर्वीही असाच प्रकार सांगेत घडला होता. शिष्टाचार सोडून माजी आमदार, मंत्र्यांची नावे घालण्यात आली होती. ही सरकारची मनमानी असल्याचे टीका आमदार प्रसाद गावकर यांनी केली.

संबंधित बातम्या