वेलिंग कुंकळ्येतील विकासकामांचे उद्‌घाटन

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ मधील सत्यनारायण देवस्थान रंगमंचाजवळ बांधलेल्या स्टोअररूम विकासकामाचे उद्‌घाटन (शनिवारी) करण्यात आले. प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यात आले.

 मडकई : वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ मधील सत्यनारायण देवस्थान रंगमंचाजवळ बांधलेल्या स्टोअररूम विकासकामाचे उद्‌घाटन (शनिवारी) करण्यात आले. प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी पंच मंगेश गावडे तसेच माजी सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संदीप गावडे, शिवराम नाईक, प्रेमानंद भट प्रभू, राजू सतरकर तसेच इतर उपस्थित होते. 

गोविंद गावडे म्हणाले, देवस्थान ही समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा देणारे स्थान आहे. समाजकार्य करताना अनेक अडचणी येतात, पण त्या निवारण्यासाठी अशाप्रकारचे स्थान निर्माण होणे ही गरज आहे. मंगेश गावडे यांनीही आपले विचार व्यक्त करताना मंत्री गोविंद गावडे यांनी भरीव विकासकामे केल्याचे नमूद केले. देवानंद सतरकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

संबंधित बातम्या