
राज्यातील गौली-धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भारताचे रजिस्ट्रार जनरल (RGI) यांच्याकडे शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि गौली धनगर समाज संघटनेचे गोव्याचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर हेही शिष्टमंडळात सहभागी होते.
या शिष्टमंडळाने आरजीआय मृत्युंजय कुमार आणि उपसंचालक मनोज कुमार यांच्याशी चर्चा केली. उपलब्ध माहितीनुसार समजते की, या प्रकरणी आरजीआयला आवश्यक असल्यास राज्य सरकारच्या अधिका-यांशी आणखी एक बैठक घेण्यास तयार आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया सकारात्मकपणे पूर्ण करुन धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलीय.
RGI ने शिष्टमंडळाला हे प्रकरण प्राधान्याने हाती घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजतेय. राज्यस्तरीय शिष्टमंडळाने जुलै 2021 मध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्ग समावेश प्रकरणी RGI ला भेट दिली होती आणि RGI ने उपस्थित केलेल्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे सादर केली होती.
या प्रकरणी कवळेकर यांनी सांगितले की, गौली-धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करणे हे त्यांचे "अंतिम ध्येय" आहे. जून 1999 मध्ये, सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश, वगळणे आणि इतर फेरफार करण्यासाठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी रूपरेषा मंजूर केली होती.
गोव्यातील धनगर, ज्यांना गौली देखील म्हटले जाते, त्यांनी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गावडा, कुणबी आणि वेलप यांच्या बरोबरीने लढा दिला होता. प्रदीर्घ लढाईनंतर, गौडा, कुणबी आणि वेळीप समुदायांना 2003 मध्ये गोव्यातील अधिसूचित जमाती म्हणून घटनात्मक दर्जा देण्यात आला, परंतु धनगरांना तेव्हापासून वगळण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.