गोवा टपाल खात्याचे प्रशंसनीय कार्य

तिकिटांवर इतिहासाचे चित्रण करणाऱ्या गोष्टींचा समावेश
Includes pictures depicting history on Goa postage stamps
Includes pictures depicting history on Goa postage stampsDainik Gomantak

पणजी: युवा पिढीला ऐतिहासिक घटनांची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याची गरजही आहे. टपाल खाते हे विश्वासार्ह खाते आहे. खात्याने विश्वास व ऋणानुबंध जपल्यानेच लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. तिकिटांवर इतिहासाच्या चित्रण करणाऱ्या गोष्टींचा समावेश हे प्रशंसनीय कार्य आहे, अशा शब्दांत टपाल खात्याचा (Goa Post Department) गौरव गोवा विद्यापीठाचे (Goa University) कुलगुरु प्रा. हरिलाल मेनन (Vice Chancellor of Goa University Harilal Menon) यांनी केला.

गोवा टपाल खात्यातर्फे काल जिल्हास्तरावर डिजिटल पद्धतीने घेण्यात आलेल्या ‘व्हर्च्युअल फिलाटेलिक प्रदर्शन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मेनन बोलत होते. यावेळी खात्याचे गोवा विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. सुधीर जाखरे, पोस्ट मास्टर कर्नल एस. एफ. एच. रिझवी, कोल्हापूर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रुपेश सोनावणे उपस्थित होते. यावेळी टपाल खात्यातर्फे प्रात्यक्षिकांद्वारे टपाल खात्याने राबविलेल्या विविध तिकीट, पोस्टर यांची माहिती देण्यात आली.

Includes pictures depicting history on Goa postage stamps
Covid-19: गोव्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना लसीकरण आवश्यक

डॉ. जाखरे म्हणाले, पोस्टाच्या तिकीटाच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या गोव्यातील नैसर्गिक चित्रण करण्यात आले. गोव्याचे निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी युवा पिढीला याची माहिती व्हावे याच उद्देशाने टपाल खात्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे गोव्याची विविधता व नैसर्गिक संपन्नता टिकून राहण्यास मदत होईल. याकामी टपाल सेवेतील कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्याचे ते म्हणाले.

तीन सेवकांचा सन्मान

गोवा टपाल खात्यातर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन सेवकांना गौरविण्यात आले. ग्रामीण डाकसेवक सुशांत माने यांनी म्हादई नदीतून पोहत जाऊन ‘टिन कॅन मेल’चा यशस्वी प्रयोग राबविल्याबद्दल सन्मान केला. तसेच चित्रीकरणासाठी राज्यातील दुर्लक्षित फुलपांखरू व ऐतिहासिक घटनांचे योग्य चित्रिकरण केल्याबद्दल छायाचित्रकार प्रसन्ना परब, शशिकांत एस. नाईक यांचाही सन्मान केला.

Includes pictures depicting history on Goa postage stamps
Omicron Variant: गोव्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना चाचणी अनिवार्य

टपाल खात्याचे कार्य...

  • आग्वाद किल्ल्यावरील लाईट हाऊसचे चित्रीकरण

  • पियेदाद ते रायबंदर या दरम्यानच्या फेरीबोटीवर ‘फेरी कॅरी कव्हर विथ स्पेशल कॅन्सलेशन’चा समावेश

  • ‘प्रेझेंटेशन पॅक आणि पोस्टकार्ड्स ऑन बटरफ्लाय आणि विविधता ऑफ गोवा विशेष रद्दीकरणासह,

  • ‘टिन कॅन मेल प्रयोग’ यावर विशेष कव्हर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com