मोरजी किनारी भागात पार्किंगची गैरसोय

वाहतूक कोंडी : पर्यटकांची वाहने ठेवण्‍यासाठी जागाच नाही
मोरजी किनारी भागात पार्किंगची गैरसोय
मोरजी किनारी भागात पार्किंगची गैरसोय Dainik Gomantak

मोरजी: मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात पार्किंगची (Parking) मोठी गैरसोय आहे. येथील जमिनींना सोन्याचे भाव आल्याने मोकळ्या जमिनींना तारेची व दगडी कुंपणे घातल्याने तसेच रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून बांधकामे केल्याने वाहने पार्क केली, तर वाहतूक कोंडी होते. त्यावर आतापर्यंत सरकारला उपाययोजना करता आलेली नाही. पार्किंग व्यवस्था नसल्याने पर्यटक मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात.

सध्या आश्वे-मांद्रे येथे पर्यटन विकास महामंडळाने मिनी पार्किंग प्रकल्प उभारला आहे. त्‍यामुळे पर्यटकांची सोय झाली आहे. आजोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा असल्याने पर्यटकांची चांगली सोय होते, त्याबद्दल समाधान व्यक्त होत होते. परंतु, आता पत्रे लावून जागा आरक्षित केल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहे. मोरजी पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्‍ते आणि अंतर्गत रस्‍त्‍यांच्या बाजूला मोठमोठी बांधकामे उभी राहत आहेत. मात्र, पार्किंग व्यवस्थेसाठी जागा आरक्षित केली नसल्याचे दिसते.

पर्यटन खाते दरवर्षी विदेश दौऱ्यावर जाऊन तेथे मोठमोठ्या जाहिराती करते. त्‍यामुळे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्‍यात येतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल राज्याला मिळतो. परंतु, हे विदेशी पर्यटक येथील गैरसोयींबद्दल ते सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायला विसरत नाहीत. त्‍यामुळे राज्‍याची प्रतिमा मलिन होते. म्‍हणूनच पर्यटन खात्याने अगोदर किनारी भागात सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून होत आहे.

मोरजी किनारी भागात पार्किंगची गैरसोय
गोमेकॉच्या परिसरातील विक्रेत्यांचा ‘ठिय्या’

किनाऱ्यापेक्षा इतर क्षेत्रांचा विकास

पर्यटन खात्याने सध्या किनारी भागाचा विकास करण्याऐवजी किनाऱ्यापलीकडील विकासकामांवर जास्त भर दिला जात आहे. किनारी भागात गैरसोयी असताना पर्यटन खात्याचा पैसा किनाऱ्याच्या पलीकडे असणाऱ्या पर्यटन स्‍थळांच्‍या सुशोभीकरणावर खर्च केला जात आहे. त्‍या ठिकाणी सुशोभीकरण करण्‍यास कुणाचा विरोध नाही, मात्र ज्‍या समुद्र किनाऱ्यांच्‍या ठिकाणी लाखो पर्यटक येतात व त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा महसूल पर्यटन खात्याला मिळतो त्याठिकाणी खर्च करण्याची गरज आहे.

नागरिकांनी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरी रेषा आखली आहे. त्याच्या बाहेर कोणीही वाहने पार्क करू नयेत. जे नियमाचा भंग करून वाहने पार्क करतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंचायतीने उपजिल्हाधिकारी आणि वाहतूक पोलिस यांना पत्र दिले आहे.

- अमित शेटगावकर, उपसरपंच, मोरजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com