ओहोटीमुळे फेरीसेवा विस्कळीत; तब्बल तीन तास प्रवासी अडकले

ओहोटीमुळे व्यत्यय: सारमानस-टोंक येथे लोकांची गैरसोय
 Ferry
FerryDainik Gomantak

डिचोली: ओहोटीमुळे आज (गुरुवारी) सकाळी फेरीसेवा बंद राहिल्याने सारमानस-टोंक जलमार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. फेरीसेवा बंद राहिल्याने दोन्ही फेरीधक्क्यावर तब्बल तीन तास प्रवासी अडकून पडले. बराचवेळ तिष्ठत राहिल्यानंतर काही प्रवाशांनी परतीचा रस्ता धरला. तर काहीनी अन्य मार्गाने प्रवास केला. या गैरसोयीमुळे मात्र नियमित प्रवाशांना नियोजित वेळेत इच्छित स्थळ गाठता आले नाही.

(Inconvenience to passengers due to disruption of ferry service due to low tide in bicholim)

 Ferry
सावधान! गोव्यात कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढतोय

वेगवेगळ्या कारणावरून सारमानस-टोंक जलमार्गावरील फेरीसेवा दिवसेंदिवस वादाचा विषय बनत आहे. ओहोटीवेळी तर सारमानस-टोक जलमार्गावरील फेरीसेवेत व्यत्यय येत असल्याने या जलमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओहोटीच्यावेळी या जलमार्गावर मध्यभागी भाट पडते. अशावेळी फेरीसेवा सुरू राहिली तर मध्यभागी फेरीबोटी अडकून पडतात.

त्यामुळे ओहोटीच्यावेळी फेरीसेवा बंद ठेवण्यात येते. गुरुवारी (ता. 16) सकाळी ओहोटीमुळे तब्बल तीन तास फेरीसेवा बंद ठेवण्यात आली होती.

 Ferry
इमारतवरून खाली कोसळल्याने अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी!

त्यामुळे नोकरी धंद्यानिमित्त माशेल, फोंडा, पणजी आदी ठिकाणी जाणारे सारमानस, पिळगाव आदी भागातील प्रवासी सारमानस फेरीधक्क्यावर अडकून पडले. दुसऱ्या बाजूने टोंक फेरीधक्क्यावरही अशीच स्थिती झाली होती. या व्यत्ययामुळे कामगारवर्गाची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, या व्यत्ययामुळे स्थानिक पंच अनिल नाईक यांनी नाराजी व्यक्त करताना सरकारने या समस्येवर उपाय काढावा, अशी मागणी केली आहे.

ओहोटीवेळी फेरीसेवा बंद राहिली की, प्रवाशांची मोठी गैरसोय होते. नियोजित ठिकाणी वेळेवर पोचता येत नाही. यावर पर्याय म्हणून नदी परिवहन खात्याने सारमानस-खांडोळा जलमार्गावर फेरीबोट तैनात करावी. जेणेकरून ओहोटीच्यावेळी प्रवाशांना या जलमार्गावरून प्रवास करता येईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळेल व वेळही वाया जाणार नाही.

-अमेय प्रभुगावकर, पिळगाव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com