kadamb bus.jpg
kadamb bus.jpgDainik Gomantak

कदंबच्या बसमुळे लाडफेतील विद्यार्थ्यांची गैरसोय

खरपाल-म्हापसा मार्गावरील ‘कदंब’ची सेवा बंद पालक संतप्त : लाडफेतील विद्यार्थ्यांची गैरसोय

डिचोली: मोठा गाजावाजा करून लाडफे-डिचोलीमार्गे सुरू करण्यात आलेली खरपाल ते म्हापसा मार्गावरील ‘कदंब’ची प्रवासी बसगाडी पुन्हा बंद झाल्याने प्रवासीवर्गाची गैरसोय होत आहे. विशेष करून लाडफे भागातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घेऊन कदंब वाहतूक महामंडळाने ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी लाडफे परिसरातील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.

(Inconvenience to students due to Kadamba bus service)

kadamb bus.jpg
हणजूणमधील आणखी एका बेकायदा मसाज पार्लरला टाळे

लाडफे आणि जवळपासच्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन आणि पालकांच्या मागणीनुसार, सहा महिन्यांपूर्वी खरपाल ते म्हापसा मार्गावर ‘कदंब’ची बससेवा सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी 21नोव्हेंबर रोजी या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर मात्र प्रवासीवर्गाची विशेष करून विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली होती. ही बस सुरू झाल्यानंतर साधारण चार महिने नियोजित मार्गावर नियमित धावत होती. त्यानंतर मध्यंतरी ही बस बंद झाली होती. अखेर स्थानिक आमदारांच्या प्रयत्नातून चालू शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभीच ही बस पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून या बसगाडीचा पत्ताच नाही. ही बस पुन्हा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

kadamb bus.jpg
सुवासिनींच्या उत्साहाला उधाण! राज्यात आज वटपौर्णिमा धार्मिक विधीनुसार साजरी

विद्यार्थ्यांची परवड

लाडफे परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी डिचोली शहराच्या ठिकाणी जात आहेत. ‘कदंब’च्या या बसमुळे सकाळी वेळेवर शाळा आणि दुपारी घर गाठणे विद्यार्थ्यांना सोयीस्कर बनले होते. मात्र, आता ही बसगाडी बंद झाल्याने विद्यार्थ्यांची परवड सुरू झाली आहे. शहराच्या ठिकाणी सकाळी वेळेवर शाळा गाठताना विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे. दुपारी वेळेवर घरी परतणेही मुश्किल बनले आहे.

विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ

साधारण तीन महिने नियमित बस वाहतूक सुरू होती. विधानसभा निवडणूक होताच बस बंद झाली. नवीन शैक्षणिक वर्षारंभाच्या तोंडावर बस पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, आठच दिवसांच्या आत ती पुन्हा बंद झाली. हा विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ आहे, असा आरोप सुविधा बोर्डेकर, सुधाकर धुरी, तुकाराम मळीक या पालकांनी केला आहे. केवळ निवडणुकीपुरतीच बस सुरू केली होती काय? असा प्रश्नही या पालकांनी उपस्थित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com