Sonali Phogat Case : सोनाली हत्या प्रकरणात संशयितांच्या कोठडीत वाढ

म्हापसा कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
Sonali Phogat Murder Case
Sonali Phogat Murder CaseDainik Gomantak

गोवा: सुखविंदर पाल सिंग आणि सुधीर सांगवान यांच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर रोजी आरोपींना पुन्हा म्हापसा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अंजुना पोलिसांनी सांगवान आणि सिंग यांची चार दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र म्हापसा कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणी म्हापसा कोर्टात 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पुढील सुनावणी होणार असून दोन्ही आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.

(Increase in custody of suspects in Sonali Phogat murder case in goa)

Sonali Phogat Murder Case
Goa Corona Update| कोरोनामुळे एकाचा मृत्यू, पाच जण रुग्णालयात

‘सोनाली मृत्यू प्रकरणाचा तपास सत्याला धरूनच’

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची चौकशी पहिल्या दिवसांपासूनच सत्याला धरून आणि पारदर्शकतेनुसार पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणाच्या मुळाशी जात पोलिसांकडून वादग्रस्त कर्लिज बार व रेस्टॉरंटच्या एडविन न्यूनीससह अन्य दोघा ड्रग्ज पेडलरांच्या मुसक्या आवळीत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे याबाबतीत कुणीच कुठलाही संशय बाळगण्याचा प्रश्नच येत नसल्याची प्रतिक्रिया हणजुणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दै. ‘गोमन्तक’कडे व्यक्त केली.

सोमवारच्या अंकात राज्यातील एका वर्तमानपत्रात फोगट मृत्यू प्रकरणात हणजुण पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना विशेष वागणूक देत असल्याचे वृत्त केवळ ऐकीव माहितीवर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे राज्यासह राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तसेच याबाबतीत होत असलेल्या तपास कामात जोडलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया आज व्यक्त होत होत्या. त्यामुळे प्रशाल देसाई यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

Sonali Phogat Murder Case
Mopa Airport|वास्‍तव! मोपा विमानतळाला अजून चार महिन्यांचा अवकाश

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात पोलिस यंत्रणा गंभीर

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात पोलिस यंत्रणा गंभीर असून आतापर्यंत याबाबतीत ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित सुधीर सांगवान तसेच सुखविंदर पाल सिंग यांच्यासह अन्य संशयितांकडूनही महत्वाची माहिती गोळा करण्यात आली आहे. हणजुण पोलिस स्थानकाच्या चारी बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाविना पोलिस ताब्यातील एकाही संशयिताला पोलिस स्थानकाच्या बाहेर काढल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी थेट दिले आहे.

संपूर्ण गोवा गणेशचतुर्थी उत्सवाचा आनंद घेत असताना हणजुणचे पोलिस दिवसरात्र फोगट मृत्यू प्रकरणाबरोबरच बादे-आसगाव येथील एलन डिसोझा याच्या हडफडे येथील संशयास्पद मृत्यू प्रकरणाचाही हणजुण पोलिस कसून तपास करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com