सावधान! काणकोण बसस्थानकात अपघाताच्या संख्येत वाढ

खाजगी बस मालक व चालकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्याचे अनेक वेळा लक्ष वेधले मात्र त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.
KTC Bus Stand
KTC Bus StandDainik Gomantak

काणकोण: काणकोण बसस्थानक पांढरा हत्ती बनण्या बरोबरच ते अपघात प्रवण बनले आहे.त्याची देखभाल करण्याकडे कदंब महामंडळ अक्षम्य अशी दिरंगाई करीत आहे.बस स्थानकावरील पाणी वाहून नेणाऱ्या गटारा वरील लोखंडी जाळी तुटून अनेक महिने झाले या घटनेकडे खाजगी बस मालक व चालकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्याचे अनेक वेळा लक्ष वेधले मात्र त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.

(Increase in the number of accidents at canacona bus stand)

KTC Bus Stand
धक्कादायक! केपे येथील अंगणवाडीचे छप्पर कोसळले

मात्र त्याचा फटका आज कदंब महामंडळाच्या बसला बसला.आज कारवार ते वास्को अशी प्रवासी वाहतूक करणारी कदंब महामंडळाची बस स्थानकावर येऊन पार्क करताना बसचे पुढील चाक गटारा वरील जाळी तुटून गटारात गेले त्यामुळे बसची नुकसानी झाली आहे.गेल्या वर्षी बसस्थानकाचे छप्पर तुटल्यामुळे छप्पराला गळती लागून पावसाचे पाणी बसस्थानकातील दुकानात शिरले होते.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून छप्पर झावळ्यानी शाकारण्याचा प्रयत्न केला मात्र तत्कालीन आमदार उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी युद्धपातळीवर महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना बोलावून पुर्ण बसस्थानकाचे पत्रे बदलले त्यामुळे आता गळती बंद झाली आहे.बसस्थानकाची रंरंगोटी करणे गरजेचे आहे.रात्री नऊ वाजता मडगाव हून पोळेला जाणारी शेवटची बस बसस्थानकावर येत असते त्यानंतर बसस्थानक भटक्या गुरांचे आश्रयस्थान बनते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com