गोव्यात 1.34 लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

काणकोणात कोरोनाग्रस्तांची संख्या अठरा झाली आहे. आज काणकोणात चार कोरोना रुग्ण सापडले. शिमगोत्सव व वेगवेगळ्या ठिकाणावरील जत्रोत्सवानंतर कोरोनाग्रस्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पणजी: राज्यात सुरू असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी आणि  पोलिस, सुरक्षा रक्षक या फ्रंन्टलाइन वर्कर्सनी जवळजवळ पहिला डोस व दुसरा डोसही घेतला. आता 60  वर्षांवरील व्यक्ती आणि 45 वर्षांवरील आजारी व्यक्ती यांच्यासह 45 वर्षांवरील सर्व नागरिक यांना कोविड प्रतिबंधक लस  दिली जात आहे. आज रविवार असूनही लसीकरण सुरुच ठेवण्यात आले.  आज आरोग्य विभागातील  6 जणांनी, तर फ्रंटलाईन वर्करमधील 10 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला.  त्याचबरोर 45 वर्षांवरील आजारी 866, तर 60 वर्षांवरील ३३७ जणांनी लस घेतली.  

45 वर्षांवरील सर्वसामान्य 1467 नागरिकांनाही लस देण्यात आली.  आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 1 लाख 34 हजार एवढे लसीकरण झाले असून राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रात, इस्पितळांत मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. खासगी इस्पितळात 250 रु. शुल्क आकारण्यात येत आहे.

गोवा लेखानुदान विधेयकाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी 

काणकोणात 4 जण कोरोनाबाधित
काणकोणात कोरोनाग्रस्तांची संख्या अठरा झाली आहे. आज काणकोणात चार कोरोना रुग्ण सापडले. शिमगोत्सव व वेगवेगळ्या ठिकाणावरील जत्रोत्सवानंतर कोरोनाग्रस्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये आगोंदमधील एक व पालिका क्षेत्रातील तिघांचा समावेश आहे. शुक्रवारी चार कोरोना रुग्ण सापडले, तर शनिवारी पालिका क्षेत्रात मास्तीमळ येथे दोन तेंबेवाडा येथे एक व अन्य ठिकाणी एक रुग्ण सापडला होता. यापूर्वी काणकोणात सहा कोरोना रुग्ण सापडले होते.

आंबा उत्पादनाचा आधीच उल्हास, त्यात कोरोनाचा फाल्गुनमास! 

 

संबंधित बातम्या