गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाटचाल अर्ध्या लाखांकडे

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

राज्यात आत्तापर्यंत ४९ हजार २३५ जणांना कोरोनांची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे रुग्ण होण्याची वाटचाल अर्ध्या लाखांकडे सुरू आहे.

पणजी: राज्यात आत्तापर्यंत ४९ हजार २३५ जणांना कोरोनांची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे रुग्ण होण्याची वाटचाल अर्ध्या लाखांकडे सुरू आहे.

आज १०४ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे. राज्यात विविध रुग्णालयांत कोरोनाचे उपचार घेऊन बरे झालेल्या १३० जणांना मागील चोवीस तासांत घरी सोडण्यात आले आहे. चोवीस तासांत एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे संचालनालयाने कळविले आहे.

आणखी वाचा:

कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये निरूत्साह -

आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ४७ हजार ३४५ एवढी झाली आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या ७०३ वर स्थिर राहिली आहे. आज १ हजार ६४४ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ९६ जणांना घरगुती विलगीकरणात उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. १०४ जण पॉझिटिव्ह आढळले असून, रुग्णालयांत ५१ नव्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. १ हजार १८७ रुग्ण राज्यभरात ॲक्टिव पॉझिटिव्ह आहेत.
 

संबंधित बातम्या