गोव्यात गर्भनिरोधकांच्या वापरात वाढ ; विविध माध्यमांद्वारे झालेल्या जनजागृतीचा परिणाम

Increase in use of contraceptives in Goa The result of public awareness through various means
Increase in use of contraceptives in Goa The result of public awareness through various means

पणजी :  गर्भनिरोधक साधनांच्या वापराच्या बाबतीत गोव्यात जनजागृती झाल्याचे आकडेवारीवरून उघड झाले. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१९- २० (एनएफएचएस) नुसार विविध गर्भनिरोधक साधने वापरण्याचे राज्यातील प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये ४१.६ टक्के एवढे झाले आहे. एनएफएचएसच्या २०१५- १६ सालच्या सर्वेक्षणात हे प्रमाण २६.३ टक्के इतके होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संपूर्ण देशाबाबतचा हा सर्वेक्षण अहवाल प्रकाशित केला आहे. गोव्यामध्ये हा सर्वे ३० ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घरोघरी जाऊन केला होता. 


गर्भनिरोधक साधनांच्या वापरातील वाढीमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी घेतल्‍या जाणाऱ्या गोळ्यांची महिलांच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१५-१६ साली गोळ्या घेण्‍याचे प्रमाण ०.३ टक्के इतके होते, तर ते या सर्वेक्षणात २.७ टक्के एवढे आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण १.७ टक्के, तर शहरी भागातील महिलांचे प्रमाण ३.४ टक्के इतके आहे. पुरुषांमध्‍ये कंडोमच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. २०१५-१६ साली कंडोम वापराचे प्रमाण ७ टक्के होते, तर ते या सर्वेत २३.२ टक्के एवढे आहे. यामध्ये ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये कंडोम वापराचे प्रमाण २१.१ टक्के, तर शहरी भागातील पुरुषांमध्ये हे प्रमाण २४.६ टक्के आहे.


या सर्वेमध्ये कुटुंब नियोजनाबाबत राज्यातील स्थितीचा चांगल्या प्रकारे आढावा घेण्यात आला आहे. राज्यातील एड्स या लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजाराबद्दल जनजगृतीही वाढली आहे. २०१५-१६ साली एड्सबाबत ४१.९ टक्के महिलांना आणि ३४.६ टक्के पुरुषांना माहिती होती. यावर्षीच्या सर्वेनुसार ६७.२ टक्के पुरुषांना आणि ४९ टक्के महिलांना एड्सबाबतची माहिती आणि प्रसाराची कारणे परिचित आहेत. जे लोक ही गर्भनिरोधक साधने वापरत आहेत, त्यांच्यात या साधनांच्या वापराबाबत मागील सर्वेच्या तुलनेत अधिक असमाधानी आहे. २०१५- १६ असमाधानाचे प्रमाण ७६ टक्के होते तर ते या सर्वेमध्ये ८५.५ टक्के झाले आहे.

जनजागृती व सजगता

टीव्ही, वृत्तपत्रे आणि आरोग्‍य केंद्रांमध्‍ये असणारे फलक यासारख्या माध्यमांतून लोकांना गर्भनिरोधक साधनांची माहिती मिळत आहे. या साधनांचा वापर वाढणे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले आहे. यामुळे गर्भधारणा तर रोखताच येते पण एड्ससारख्या लैंगिक आजारांचा प्रसारसुद्धा टळतो. सध्याचे तरुण - तरुणी ही साधने वापरण्याबाबत लाजत नाहीत. गोवा हे विकसित राज्य आहे आणि तेथे या साधनांचा वाढता वापर असल्याची टक्केवारी लोकांमधील सजगता दर्शवत असल्याची माहिती टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सच्या पीचडी स्कॉलर प्रीतम पोतदार यांनी दिली.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com