सासष्टीत कोरोना रुग्ण संख्येत वाढ; सतर्कता बाळगण्याच्या दिल्या सूचना

Increased number of corona patients in the sashti
Increased number of corona patients in the sashti

सासष्टी: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारकडून पुन्हा एकदा नागरिकांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली असून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंताही वाढलेली आहे. सासष्टी तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 161 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती, तर आज हा आकडा 557 वर पोहचलेला आहे. सासष्टी तालुक्यात गेल्या आठ दिवसात 315 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून काल एका दिवसात 96 कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत.(Increased number of corona patients in the sashti)

 
सासष्टी तालुक्यात मडगाव शहर आरोग्य केंद्र, कासावली प्राथमिक आरोग्य केंद्र, नावेली प्राथमिक आयोग्य केंद्र, चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लोटली प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून या सर्व आरोग्य केंद्रांत आतापर्यंत 667 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या 161 होती, तर 23 मार्चपर्यंत ही संख्या 258 वर पोहचली होती, परंतु गेल्या काही दिवसाची आकडेवारी पाहिल्यास कोरोना पॉझिटिव्ह झालेले अनेक रुग्ण समोर आले आहेत.

  
गोवा सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या अहवालानुसार मडगाव शहर आरोग्य केंद्रात 28 फेब्रुवारीपर्यंत 85 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, आज आकडा 348 वर पोहचला आहे. कासावली आरोग्य केंद्रात 17 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, तर आज हा आकडा 111 वर पोहचला आहे. नावेली आरोग्य केंद्रात फक्त दोनच कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. आज तो आकडा 39 वर पोहचला आहे.  चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 होती, आज 69 वर पोहचली आहे. कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 होती, आज 44 वर पोहचली आहे. लोटली प्राथमिक आरोग्य पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 होती, आज 56 वर पोहचली आहे. 


सासष्टी तालुक्यातील आरोग्य केंद्रात 31 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत 219 कोरोनाबाधित झालेले रुग्ण आढळून आले होते, तर काल एका दिवसात 96 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत असून सासष्टी तालुक्यातील मडगाव शहर आरोग्य केंद्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस गोव्यात नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असून कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण प्रक्रियेलाही सुरवात करण्यात आली आहे, परंतु कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसून येत नसल्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांत वाढत गेलेला आहे.

 
सासष्टीत 667 कोरोनाबाधित!
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 144 रुग्ण
मडगावात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या मडगाव दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 144 रुग्ण उपचार घेत असून यातील 8 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  आज अतिरिक्त 17 कोरोनाबाधित रुग्णांना जिल्हा इस्पितळात भरती करण्यात आले आहे. दक्षिण गोव्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालल्याने मडगावमधील इएसआय कोविड इस्पितळात रुग्णांना दाखल करण्यात आले असून या इस्पितळात 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com