Breast Cancer: सावधान! गोव्यात स्तन कर्करोगाचे वाढतेय प्रमाण

स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण धक्कादायक असून येत्या वर्षभरात आणखी 50 हजार महिलांच्या चाचण्या केल्या जातील,अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली.
Breast Cancer
Breast CancerDainik Gomantak

Breast Cancer: देशाप्रमाणे राज्यातही महिलांमधील स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणेच्या साहाय्याने केलेल्या तपासण्यापैकी 2.48 टक्के संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. हे प्रमाण धक्कादायक असून येत्या वर्षभरात आणखी 50 हजार महिलांच्या चाचण्या केल्या जातील.

त्यासाठी अत्याधुनिक सुविधा वाढण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली.

सरकारचे आरोग्य खाते, एसबीआय फाउंडेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स आदींच्या सहकार्याने आज जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Breast Cancer
Shigmo Festival : शिमगोत्सव मिरवणुकीला यंदाही वेळेचे बंधन कायम

‘राज्यातल्या वाढत्या कॅन्सरचे प्रमाण धोकादायक असून वेळीच चाचण्या आणि निदान झाल्यास हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी विविध संस्थांच्या वतीने चालू असलेले प्रयत्न नक्कीच महत्त्वाचे आहेत.

राज्यातील महिलांसाठी आणि इतर कॅन्सरसाठीच्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे. येत्या काही दिवसांत राज्यात कॅन्सर संबंधीच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, अशी आशा आहे’, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

Breast Cancer
Goa News: कोळसा हाताळणी बंद करा; म्हादईला वाचवा!

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला आरोग्य सचिव अरुणकुमार मिश्रा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अनुपमा बोरकर, युवराज सिंग फाउंडेशनच्या अध्यक्षा शबनम सिंग, संजय प्रकाश, भूमिका संघवी, गौरी नावेलकर, बिशवा केतन दास आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com