Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत चुरस वाढली

मडगाव नगराध्यक्षपदासाठी घनश्याम शिरोडकर यांचा उमेदवारी अर्जं; मॉडेल मडगावचा दामोदर शिरोडकर उमेदवार
Madgaon Municipal Council
Madgaon Municipal CouncilDainik Gomantak

Madgaon Mayor Election : मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंग भरू लागला असून अपक्ष नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांचे नाव भाजपचे महेश आमोणकर, कामिल बार्रेटो आणि पार्वती पराडकर यांनी सुचविल्याने या 'कौन बनेगा नगराध्यक्ष' खेळाला नवीन ट्विस्ट मिळाली आहे. 16 सप्टेंबर रोजी मडगावचा नवीन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.

Madgaon Municipal Council
IIT Goa : सांगेत आयआयटी होणारच!; मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

आज दिगंबर कामत गटाच्या मॉडेल मडगावच्या नगरसेवकांची बैठक होऊन त्यांनी आपला उमेदवार म्हणून दामोदर शिरोडकर यांचे नाव निश्चित केले मात्र त्यांचे सत्तेतील भागीदार विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्ड गटाने आपली भुमिका अजून निश्चित केलेली नाही. आज सकाळी या गटाच्या नगरसेवकांची बैठक होणार होती पण ती झाली नाही.

मडगाव पालिकेत भाजपकडे 9 नगरसेवक असून त्यांना स्वबळावर आपला उमेदवार निवडून आणणे शक्य नाही. अशा परिस्थितीत या सर्व नगरसेवकांनी घनश्याम शिरोडकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. असे जरी असले तरी शिरोडकर यांना निवडून यायचे असेल तर त्यांना कामत किंवा सरदेसाई यांच्या गटातील तीन नगरसेवकांना फोडावे लागणार आहे.

Madgaon Municipal Council
Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदाचा आज होणार फैसला

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर घनश्याम शिरोडकर यांनी मडगाव पालिकेत मागच्या 15 महिन्यात अपेक्षित असे काम झालेले नाही. यासंबंधी आपण वेळोवेळी आवाज उठविला आहे. पालिकेचे प्रशासन जाग्यावर आणण्यासाठी आपण नगराध्यक्ष बनू पाहत असून त्यासाठी आपण सर्व नगरसेवकांचे समर्थन मागितले आहे.

दरम्यान आज सकाळी आमदार दिगंबर कामत यांनी आपल्या निवासस्थानी आपल्या गटाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आपल्या गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दामोदर शिरोडकर यांचे नाव निश्चित केले. यासंबंधी दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र अजून फातोर्डा फॉरवर्ड गटा बरोबर आमची संयुक्त बैठक झालेली नाही. ही बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com