गोविंद गावडेंच्या भाजपप्रवेशाची तारीख ठरली

अपक्ष आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची गावडेंची घोषणा
Govind Gaude all set to join BJP
Govind Gaude all set to join BJPDainik Gomantak

पणजी : अपक्ष आमदार गोविंद गावडे यांचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे गावडेंच्या भाजपप्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. (Govind Gaude all set to join BJP)

Govind Gaude all set to join BJP
गोव्यात भाजपचेच होर्डिंग्‍स निवडणूक आयोगाच्‍या कचाट्यातून कसे काय सुटले?

गोविंद गावडे यांना भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी पक्षात येण्यासाठी आवाहन केलं होतं. याच आवाहनाला प्रतिसाद देत आज दुपारी अपक्ष आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा गोविंद गावडे यांनी केली आहे. तसंत दुपारी 3 वाजता अपक्ष आमदारकीचा राजीनामा देऊन 4 वाजता भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

Govind Gaude all set to join BJP
कोविडयोद्ध्यांना नोकऱ्यांमध्‍ये प्राधान्य द्या, अन्यथा...

दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी समर्थक आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याचंही गोविंद गावडे यांनी सांगितलं. गेला आठवडाभर आपण मतदारसंघात प्रचारासाठी (Election Campaign) फिरत होतो. त्यावेळी आपण समर्थक आणि कार्यकर्त्यांशी बोललो. त्यांनी आपल्या भाजपप्रवेशाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं गावडेंनी स्पष्ट केलं. तसंच आपण एकाच मतदारसंघात अडकून पडणार नाही. त्यामुळे अन्य मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी भाजपसोबत जात असल्याचंही गोविंद गावडेंनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com