अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढला

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले. जमीन व्यवहारांबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुशाल  चौकशी करावी असे थेट आव्हानही गांवकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

पणजी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदार गांवकर यांच्यावर आयआयटीच्या प्रश्नावर आरोप केले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सांगे मतदारसंघातील अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले. जमीन व्यवहारांबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुशाल  चौकशी करावी असे थेट आव्हानही गांवकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

'आयआयटी प्रकल्पासाठी सांगे मतदारसंघात कोटार्ली, रिवण आणि उगें या तीन जमिनी मी त्यांना सुचवल्या. यापैकी दोन भूखंड हे सरकारच्या मालकीचे होते. मीच प्रथम सरकारी जमिनीतून पैसे खायला मिळतात असे त्यांच्याकडूनच ऐकले. तर उगें येथील जागा ही सोशियादाद सोसायटीची आहे. तेथील एकही रूपया जर खायला मिळत असेल ते त्यांनी दाखवावे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी जे आरोप केले, त्याच्या चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. जमिनींचे कोणतेही गैर व्यवहार केलेले नाहीत. हवे तर मुख्यमंत्र्यांनी पाईक देवस्थानात येऊन नारळाला हात लावून प्रमाण व्हावे.' असे ते यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले      

संबंधित बातम्या