‘भारत-उझबेकिस्तान' दहशतवादाविरुद्ध एकत्र

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

भारत आणि उझबेकिस्तान दहशतवादाविरुद्ध ठामपणे एकत्रित लढत आहेत. दोन्ही देशांना फुटीरतावाद, मूलतत्वावादाची समस्या भेडसावत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली : भारत आणि उझबेकिस्तान दहशतवादाविरुद्ध ठामपणे एकत्रित लढत आहेत. दोन्ही देशांना फुटीरतावाद, मूलतत्वावादाची समस्या भेडसावत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झियोयेव यांच्याबरोबरच्या आभासी चर्चेत ते बोलत होते. भारताला उझबेकिस्तानबरोबर दृढ विकासात्मक भागीदारी हवी असून उभय देशांत संरक्षण, कृषी क्षेत्रातील सहकार्य वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. मिर्झियोवेव यांनी भारत उझबेकिस्तानचा अत्यंत जवळचा व विश्वासू मित्र असल्याचे सांगितले. 

संबंधित बातम्या