India Bike Week 2023: गोव्यात रंगणार रेसिंग दुचाकींचा थरार; इंडिया बाइक वीकची 'या' तारखेपासून धूम...

चाय पकोडा राईड्स, संगीत महोत्सवाचे आकर्षण
India Bike Week 2023:
India Bike Week 2023:Dainik Gomantak

India Bike Week 2023 In Goa: इंडिया बाइक वीक 2023 (IBW 2023) यावेळी गोव्यात 8 आणि 9 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी, बाइकस्वार शौकिनांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि गोव्याच्या सहलीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

गल्फ सिंट्रॅकच्या सहकार्याने होणाऱ्या या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, ते इंडिया बाइक वीक्सच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. यात दुचाकीस्वारांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.

India Bike Week 2023:
गोव्यातील फादर अँथनी फर्नांडिस यांनी खरंच पुन्हा हिंदू धर्म स्विकारला?

IBW चे हे पर्व बाईकप्रेमींसाठी एक रोमांचक अनुभव असणार आहे. मोटोक्रॉस प्रेमी असो किंवा साहसी रायडिंग प्रेमी, प्रत्येकाला रेसट्रॅकवर रेसिंग बाइक्सवर त्यांचे रायडिंग कौशल्य दाखवण्याची संधी येथे मिळेल.

शर्यतींव्यतिरिक्त, कार्यक्रमातील सहभागींना गोवा आणि त्यापलीकडे विशेष क्युरेट केलेल्या अनुभवांसह बिग ट्रिप सत्रे, खरेदी, राइड-आऊट यांसारख्या रोमांचक उपक्रमांमध्येही सहभागी होता येईल.

India Bike Week 2023:
Konkan Railway Police Assault: धक्कादायक! साध्या वेशातील पोलिसाला मारहाण; मडगाव रेल्वे स्थानकातील घटना

या कार्यक्रमावर भाष्य करताना, सेव्हंटी ईएमजीचे सीईओ आणि संस्थापक मार्टिन दा कोस्टा म्हणाले, “या वर्षी आम्ही गोव्यात IBW चा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी गल्फ ऑइलसोबत भागीदारी केली आहे.

देशातील बाइक संस्कृतीच्या आश्चर्यकारक वाढीमध्ये इंडिया बाइक वीकची भूमिका महत्वाची राहिली आहे. चाय पकोडा राइड्स, राइड-आउट, संगीत महोत्सव, फूड ट्रेल्स इत्यादी अनेक आकर्षणांसह इंडिया बाईक वीकचे यंदाचे पर्व यशस्वी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com