Goa's Nanda Lake: रामसर कन्व्हेन्शनमध्ये गोव्यातील नंदा तलावाचा समावेश

विविधतेने नटलेल्या गोव्यातील नंदा तलावाला नक्की भेट द्या
Goa's Nanda Lake: रामसर कन्व्हेन्शनमध्ये गोव्यातील नंदा तलावाचा समावेश
LakeDainik Gomantak

भारताचे रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत नियुक्त करण्यासाठी आणखी 26 पाणथळ जागा प्रस्तावित केल्या आहेत. जगभरातील निवडक पाणथळ (Lake) प्रदेशांचे पर्यावरणीय वैशिष्ट्य जपण्यासाठी आंतरसरकारी जागतिक करार केला आहे. या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारतातील अशा पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या 75 होईल. या मध्ये विविधतेने नटलेल्या गोव्यातील नंदा तलावाचा समावेश आहे. (Goa's Nanda Lake)

आत्तापर्यंत, भारतातील (India) 49 पाणथळ जागा जागतिक महत्त्वाची स्थळे म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtr) ठाणे खाडी, गोव्यातील (Goa) नंदा तलाव, तामिळनाडूतील 12, ओडिशातील चार पाणथळ जागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तीन मध्य प्रदेशातील पाणथळांचा समावेश आहे.

Lake
देशात कोरोनाचा फैलाव वाढला; गोव्यातही 376 सक्रिय रुग्णांची नोंद

कन्व्हेन्शन अंतर्गत सदस्य देश त्यांच्या इको-सेवा आणि समृद्ध जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतील अशा साइट्सची ओळख करून देतात. पाणथळ जमीन - ऋतूनुसार किंवा कायमस्वरूपी पाण्याने व्यापलेली जमीन - पूर नियंत्रणात आणि पाणी, अन्न, फायबर आणि कच्च्या मालाचे स्रोत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय, अशा जमिनीचे क्षेत्र खारफुटीला देखील आधार देतात जे किनारपट्टीचे संरक्षण करतात आणि प्रदूषक फिल्टर करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com