Indian Coast Guard: सागरी प्रदूषण रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे गोव्यात चर्चासत्र

गोवा जिल्हा मुख्यालयामार्फत करण्यात आले होते आयोजन
Indian Coast Guard
Indian Coast GuardDainik Gomantak

Indian Coast Guard समुद्र किनारे स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी तसेच सागरी प्रदूषण रोखण्यासंदर्भात विचार विनिमय आणि उपाययोजना करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा जिल्हा मुख्यालयामार्फत काल व आज दोन दिवसीय चर्चासत्र, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

गोवा येथील भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक अरुणाभ बोस यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले.

Indian Coast Guard
Tribal Sports Festival 2023 : सरकारकडून खेळासाठी चांगल्या सुविधा : कृषिमंत्री रवी नाईक

अरबी समुद्रापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते. या वाहतुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात तेलगळती होत असून समुद्रात प्रदूषणाची भीषण समस्या निर्माण होते.

अशावेळी भारतीय तटरक्षक दलावर असे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असते. याच विषयांच्या अनुषंगाने या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व महत्त्वाच्या संस्थांसोबत या दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Indian Coast Guard
Kadamba Transport: दिव्यांगांसाठी अनुकूल 20 नवीन इलेक्ट्रिक बसेस 'कदंबा'च्या ताफ्यात दाखल होणार

या दोन दिवसीय कार्यशाळेत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, मत्स्य विभाग, मुरगाव बंदर प्राधीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, कॅप्टन ऑफ पोर्ट आणि मर्केंटाइल मरीन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com